मारहाण केल्याने विषारी द्रव पिले

By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-05T00:15:56+5:302015-01-05T00:38:48+5:30

परळी : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा़ टी़ पी़ मुंडे व त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने एकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना रविवारी घडली़

Harmful toxic fluid piglets | मारहाण केल्याने विषारी द्रव पिले

मारहाण केल्याने विषारी द्रव पिले

परळी : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा़ टी़ पी़ मुंडे व त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने एकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना रविवारी घडली़
सुधाकर गित्ते असे तक्रारकर्त्याचे नाव आहे़ टी़ पी़ मुंडे यांचे दोन कर्मचारी गित्ते यांच्या घरी गेले होते़ या दोघांनी त्यांना जबरदस्तीने मुंडे यांच्याकडे आणले़ तेथे त्यांना मारहाण झाली़ त्यामुळे त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याचा जवाब गित्ते यांनी दिला़ त्यावरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Harmful toxic fluid piglets