शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

चक्क मजुराच्या हाती करमूल्यांकनाच्या चाव्या

By admin | Updated: July 15, 2016 01:09 IST

औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. दुसरीकडे प्रभाग ‘ई’ मध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत

औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. दुसरीकडे प्रभाग ‘ई’ मध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करीत असलेल्या सफाई मजुराकडे नागरिकांनी मालमत्तांना कर आकारणी करून द्या, अशी मागणी केलेले तब्बल ५५ अर्ज सापडले. चिरीमिरीच्या अपेक्षेने या वसुली अधिकारी तथा सफाई मजुराने गेल्या कित्येक दिवसांपासून हे अर्ज स्वत:जवळ कर आकारणी न करता दाबून ठेवल्याचे आढावा बैठकीत समोर आले.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढते आहे. शहरात नवीन मालमत्ता वाढत असताना त्यांना कर आकारणी केली जात नसल्यामुळे नागरिक आपल्या मालमत्तांना कर आकारणी करून घेण्यासाठी प्रभाग कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र जोपर्यंत कर आकारणी करणाऱ्यांचा खिसा गरम होत नाही, तोपर्यंत त्या मालमत्तांना कर आकारणीच केली जात नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. जानेवारीपासून वसुली अधिकारी बनलेला सफाई मजूर अर्ज निकाली काढत नाही. जर एका प्रभागात हे चित्र आहे तर अन्य विभागातील काय अवस्था असेल. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असतील याची चौकशी झाली पाहिजे. गेल्या वर्षभरात या भागात किती मालमत्तांचे कर कमी करण्यात आले आहेत, याविषयी माहिती मागविली आहे. याशिवाय चुकीची कर आकारणी करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे उपमहापौरांनी सांगितले.