शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर ‘हळद्या’चा हल्ला

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या

औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकटे मात्र फेर धरून आहेत़ मागील वर्षी रबी हंगामात गारपीट, खरीप हंगामातही पावसाची उघडीप, उशिराने झालेल्या पेरण्या व पुन्हा पाऊस गायब झाल्याने पाणीटंचाई कायम व हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनवरही हळद्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ औसा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले़ मागील चार-पाच वर्षातील पावसाची वर्गवारी पाहता पाऊस कमी कमी होत गेल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे़ मागील वर्षी सबंध तालुक्यात रबी हंगामातील पिके जोमदार होती़ पण ही पिकेहाता-तोंडाशी आल्यानंतर मार्च महिन्यात दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली़ आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ त्यामधून कसातरी सावरलेला शेतकरी खरीप हंगामाची वाट पाहू लागला़ पण खरीप हंगामातील पेरण्यासाठी पाऊस वेळेवर झाला नाही़ तब्बल एक महिना उशिराने पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ अन् ६० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ अनेकांना दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या़ अन् पुन्हा पाऊस गायब झाला़ कमीअधिक पावसावर सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले होते़ पण आता हळद्याचा फटका बसणार आहे़ औसा तालुक्यात यावर्षी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ पेरण्या उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रावर पेरण्या केलेल्या सोयाबीनला कधी कमी व कधी रिमझिम पावसामुळे रोगराईचे प्रमाण अधिक वाढले आहे़ यामुळे अधिक फवारण्या करून मेटाकुटीला आलेला शेतकरी आता हळद्या रोगाच्या हल्ल्यामुळे हवालदिल झाला आहे़ यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहेच़ पण परिपक्व न होताच सोयाबीन काढणीला येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत़ एक झाले की दुसरे संकट येत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शेती धरताही येईना आणि सोडताही येईना अशी अवस्था झाली आहे़(वार्ताहर)