शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
4
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
5
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
6
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
7
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
8
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
9
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
10
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
11
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
12
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
13
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
14
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
15
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
16
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
17
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
18
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
19
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
20
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा पकडला; आरोपी निसटले

By admin | Updated: May 13, 2014 01:07 IST

वसमत : अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेतून वसमतमध्ये आणला जाणारा गुटख्याचा मोठा साठा नांदेड रेल्वे पोलिसांनी पकडला.

वसमत : अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेतून वसमतमध्ये आणला जाणारा गुटख्याचा मोठा साठा नांदेड रेल्वे पोलिसांनी पकडला. गुटखा घेवून येणारे आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या छाप्यातून वसमत गुटखा तस्करांचे प्रमुख केंद्र झाल्याचे समोर आले आहे. घटना घडून तीन दिवस झाले तरीही अद्याप गुन्हा मात्र दाखल नाही. वसमत शहर गुटखा तस्कारांचा अड्डा होवून बसले आहे. शहरातील शुक्रवारपेठेतील वेशीजवळ गुटखा साठवणुकीचे गोदाम असून तेथूनच गुटखा खुलेआम तालुकाभरात वितरित होत आहे. वसमतमधील काही ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आशीर्वादानेच गुटख्याचा व्यवसाय वसमतमध्ये जोरात सुरू झाल्याचेही आरोप होत आहेत. रेल्वे मार्गे वसमत स्थानकावर गुटखा उतरवला जातो तेथून वाहनाद्वारे शुक्रवारपेठमधील गोदामावर हा गुटखा पोहोचत असतो. १० मे रोजी अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेसमधून नेहमीप्रमाणे गुटख्याचा साठा वसमत रेल्वेस्थानकावर उतरणार असल्याची खबर रेल्वे पोलिसांना लागली. नांदेड रेल्वे पोलिसांचे पथक वसमत रेल्वेस्थानकावर हजर झाले. शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास रेल्वे वसमतच्या स्थानकावर आली व पोलिसांनी प्रवाशांच्या डब्यात शोध मोहिम सुरू करून गुटख्याचा साठा जप्त केला. जप्त केलेला गुटख्याचा साठा घेवून रेल्वे पोलिस नांदेडला रवाना झाले. याप्रकरणी नांदेड रेल्वेचे फौजदार प्रभाकर चिंचणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी छाप्यात शासनाने बंदी घातलेला गुटखा पकडल्याचे सांगितले. याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाला पत्र देवून पुढील कारवाई करण्याचे कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमका किती साठा आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न व भेसळ विभागाकडून तक्रार येणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. या छाप्यात फौजदार प्रभाकर चिंचणे, पोन राठोड, चोपडे, नारनवरे आदी रेल्वे पोलिस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. आरोपी मात्र फरार असून. त्यामुळे हा माल नेमका कोणाचा हे गुढ उकलू शकले नाही. पोलिसांना पाहताच आरोपी रेल्वेतून उतरून पसार झाल्याचे वृत्त आहे. शहरातील शुक्रवारपेठेतील वेशीजवळ गुटखा साठवणुकीचे गोदाम असून तेथूनच गुटखा खुलेआम तालुकाभरात वितरित होत आहे. वसमतमधील काही ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आशीर्वादानेच गुटख्याचा व्यवसाय वसमतमध्ये जोरात सुरू झाल्याचेही होत आहेत आरोप १० मे रोजी अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेसमधून नेहमीप्रमाणे गुटख्याचा साठा वसमत रेल्वे स्थानकावर उतरणार असल्याची खबर रेल्वे पोलिसांना लागली. शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास रेल्वेस्थानकावर आली व पोलिसांनी प्रवाशांच्या डब्यात शोध मोहीम सुरू करून गुटख्याचा साठा जप्त केला. शासनाने बंदी घातलेला गुटखा पकडण्यात आला असून या प्रकरणी अन्न व भेसळ विभागाला पत्र देवून पुढील कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे. पथकाने नेमका किती साठा जप्त केला आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नसल्याचेही त्यांचे आहे म्हणणे .