बालाजी बिराजदार, लोहारा
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेतले. मात्र पैशाअभावी पुढील शिक्षणाचा मार्ग कठीण बनला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षकांनी स्नेहाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. या माध्यमातून जवळपास ६३ हजार ४७७ रुपये जमा झाले होते. ही सर्र्व रक्कम बुधवारी गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या हस्ते स्नेहा आणि तिच्या आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात आली.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्नेहाने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण लोहारा येथेच पूर्ण केले. चौथी आणि सातवीमध्ये ती शिष्यवृत्तीधारक बनली होती. आई-वडील मोलमजुरी करुन तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. दहावीमध्ये स्नेहाने रात्रंदिवस एक करुन अभ्यास केला. आई-वडिलांच्या आशा अपेक्षा पूर्ण करत ९६ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. एकीकडे स्नेहाच्या यशाने आनंदित झालेल्या आई-वडिलांना तिच्या पुढील शिक्षणाची चिंता लागून राहिली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने आवाहनात्मक वृत्त प्रकाशित केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्य मिरा अविनाश माळी यांनी स्नेहाला शैक्षणिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे यांनी स्नेहाच्या आई-वडीलांची भेट घेऊन तिला पुढील शिक्षणासाठी लातूर येथे ठेवा, अशी विनंती केली. यावेळी तिच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत, ते परवडणारे नाही, असे स्पष्ट केले. त्यावर वाघमोडे यांनी पैशाची चिंता करु नका, आम्ही पैसा जमा करु असे सांगून दिलासा दिला. त्यानंतर केंद्रप्रमुख वाघमोडे यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेत जाऊन स्नेहाला आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन केले. याला तालुक्यातील गुरुजींचा चांगला प्रतिसाद मिळाला. बघता बघता ६७ हजार ४७७ रुपये जमा झाले. ही रक्कम बुधवारी गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांच्या हस्ते स्नेहा आणि तिच्या आई-वडीलांकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन एस.के. तडकले, सी.जी. कदम, अशोक रोडगे, एस.एन. शेख, के. एम. माणिकशेट्टी, जीवन गायकवाड, एन.टी. आदटराव, बी.के.यरमुनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्नेहा व तिच्या आई-वडीलांनी ‘लोकमत’ आणि गुरुजणांचे आभार मानले.
गुरुजींनी दिली स्नेहाच्या शिक्षणासाठी ६७ हजारांची मदत
By admin | Updated: July 31, 2014 00:45 IST
बालाजी बिराजदार, लोहारा प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करुन लोहारा येथील स्नेहा मठपती या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेतले.
गुरुजींनी दिली स्नेहाच्या शिक्षणासाठी ६७ हजारांची मदत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}