शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री-सदस्यांत मतभेद

By admin | Updated: June 27, 2014 00:08 IST

सतीश जोशी , परभणी परभणी जिल्हा नियोजन आणि विकास समितीची (डीपीडीसी) बैठक पुन्हा एकदा निधी वाटपावरुन गाजली.

सतीश जोशी , परभणी
परभणी जिल्हा नियोजन आणि विकास समितीची (डीपीडीसी) बैठक पुन्हा एकदा निधी वाटपावरुन गाजली. पालकमंत्री सुरेश धस आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते बाळासाहेब जामकर यांच्यात शाब्दीक चकमक झाली. निषेधार्थ बाळासाहेब जामकर यांच्या पाठोपाठ समितीचे २४ पैकी २१ सदस्य सभागृहाबाहेर पडल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. येथील बी. रघुनाथ सभागृहात गुरुवारी सकाळी ही सभा पार पडली.
आम्ही सूचविलेल्या तातडीच्या आणि आवश्यक कामांना मंजुरी देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी या सदस्यांनी पालकमंत्र्यांसमोर केली होती. आपण सूचविलेल्या प्रस्तावावर आम्ही स्वाक्षरी करणार नाहीत, आमची त्यास मंजुरी नसेल, असा पवित्रा या सदस्यांनी घेतल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. यानंतर पालकमंत्री सुरेश धस हे ही संतप्त झाले. तुमच्या मंजुरीची गरज नाही, असे सांगितल्यामुळे सदस्य आक्रमक झाले. यातच पालकमंत्र्यांच्या विधानामुळे मान-अपमान नाट्यास प्रारंभ झाला आणि समितीचे सदस्य तथा परभणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांनी निषेध करीत सभात्याग केला. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण मुंडे हे ही बाहेर पडले. हे दोघे सभागृहाबाहेर पडताच इतर सदस्यही त्यांच्या पाठोपाठ सभागृहाबाहेर आल्यामुळे व्यासपीठावरील नेते मंडळीही चकित झाली. कदाचित असे घडेल, असे या नेते मंडळींनाही वाटले नाही. व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश धस यांच्यासह जि. प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, खा. संजय जाधव, आ. सीताराम घनदाट, आ. मीराताई रेंगे, आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, मनपा आयुक्त अभय महाजन आदी अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते. अशा गोंधळातच काही प्रस्तावांना मान्यता देऊन ही सभा संपली. या सभेत पाणीपुरवठा योजना, जिल्हा पर्यटन विकासनिधी आदी संदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच केकरजवळा आणि बनवस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास परवानगी देण्यात आली.
बाळासाहेब जामकर झाले संतप्त
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब जामकर, लक्ष्मण मुंडे, मीनाताई राऊत, गंगाधर कदम, आदी सदस्य मंडळी बी. रघुनाथ सभागृहाच्या एका कक्षामध्ये एकत्र जमली होती. तत्पूर्वी बाळासाहेब जामकर सभागृहाबाहेर पडल्यानंतर आ.बाबाजानी दुर्राणी आणि राकाँ जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी जामकर यांना सभागृहाच्या पडद्यामागे भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त झालेल्या बाळासाहेब जामकर यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर आ. दुर्राणी आणि विजय भांबळे हे जामकर यांना सर्व सदस्यांसोबत भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी पालकमंत्री आणि जामकर यांच्यात बैठक झाल्याचे कळले असले तरी जामकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांची नाराजी दूर झाली की नाही, हे कळले नाही.