शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन

By admin | Updated: May 15, 2014 00:02 IST

लातूर : छत्रपती संभाजी राजे यांची जयंती बुधवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़.

 लातूर : छत्रपती संभाजी राजे यांची जयंती बुधवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूकही बुधवारी काढण्यात आली़ शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संभाजीराजेंना अभिवादन करण्यात आले़ जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते़ धर्मवीर संघटनेच्या वतीने सकाळी गंजगोलाईतील जगदंबामातेला दुग्धाभिषेक करुन संस्थापक अध्यक्ष राहुल अंधारे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली़ तसेच यानिमित्त शिवाजी चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले़ उद्घाटन तथागत गौतम बुद्ध व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले़ शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले़ यावेळी बाबूअप्पा बावगे, गणेश शास्त्री, शंशीपंकज मधुकर, अ‍ॅड़विजय सलगरे, विक्रम मदने, प्रशांत बावगे, डॉ़उमांकात जाधव यांच्यासह शेकडो संभाजीराजे प्रेमींची उपस्थिती होती़ संभाजी सेनेच्या वतीने संपर्क कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले़ छत्रपती संभाजी महाराज उद्यान लातुरात व्हावे, यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला़ कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष भगवान माकणे, अरुण शिंदे, केशव गंभीरे, अ‍ॅड़वैजनाथ सूर्यवंशी, आकाश पाटील, सुजीत भोसले, सचिन जाधव, हर्षल गंभीरे, दिनेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़ वीर भगतसिंह परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्राग़णेश बेळंबे यांच्या व्याख्यान घेण्यात आले़ उद्घाटन बुद्धवंदना घेऊन व संभाजीराजेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन झाले़ अध्यक्षस्थानी रामदास कांबळे होते़ शिवाजी सावंत, प्रा़विश्वनाथ आल्टे, प्रा़विनोद चव्हाण, अ‍ॅड़राहुल गायकवाड, श्रीनिवास बडूरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी बेळंबे म्हणाले, मातृभूमीसाठी बलिदान देणारे संभाजी महाराज तरुणांसाठी क्रांतीची प्रेरणा ठरले आहेत़ त्यांनी बुद्धांना अभिप्रेत असणारी समता आपल्या स्वराज्यात प्रस्थापित केली होती़ सूत्रसंचालन सचिन साळुंके यांनी केले़ आभार कृष्णा शिंदे यांनी मानले़ मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़ यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़धनंजय भिसे, अ‍ॅड़महादेव चापुले आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)