शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेत मोठी वाढ

By admin | Updated: June 18, 2014 01:36 IST

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेला खंबीर पाठिंबा व शिक्षण मंडळाने २०११ मध्ये सोडलेल्या कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पास या वर्षी चांगली फळे लागली.

औरंगाबाद : शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेला खंबीर पाठिंबा व शिक्षण मंडळाने २०११ मध्ये सोडलेल्या कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पास या वर्षी चांगली फळे लागली. महसूल व पोलीस विभागाच्या मदतीने प्रभावीपणे राबविलेल्या या अभियानामुळे पहिल्या वर्षी तब्बल ५८.५० टक्क्यांपर्यंत घसरलेला निकाल यंदा ८७.०६ टक्क्यांवर आला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६३.२३ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्याने गुणात्मकता सुधारण्यात घेतलेली झेप मोठी आहे. यंदा बारावीपाठोपाठ दहावीतही बीड जिल्ह्याने विभागात प्रथम क्रमांक पटकावला. बीड जिल्ह्यातील ९,९९६ विद्यार्थी (३३ टक्के) विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील ११,७२५ विद्यार्थी (३९ टक्के), जालना जिल्ह्यातील १३ टक्के, परभणी जिल्ह्यातील १० टक्के आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. विभागात ३० हजार २७९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २३.६३ टक्के असून, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ५० हजार ७४५ विद्यार्थ्यांची टक्केवारी ३९.६० एवढी लक्षणीय आहे. त्याचे कारणच शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमध्ये दिसते, असे मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वीपर्यंत दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांभोवती पालक व नागरिकांचा नेहमी घोळका असायचा. वर्गात विद्यार्थी व बाहेर त्यांचे नातेवाईक, मित्र कॉप्या पुरविण्यासाठी जमा झालेले असत. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाचा जन्म झाला. हे अभियान शालेय शिक्षणमंत्र्यांनी उचलून धरले. अभियानात महसूल, पोलीस व अन्य शासकीय विभागांना सामील करून त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला निकाल घटला; परंतु नंतर मात्र विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला व निकालातही तशी वाढ होत गेली. संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्वसमावेशक ‘गैरमार्गाशी लढा’ हे कृती अभियान मंडळाने राबविले. त्याचा परिणाम कॉप्याचे प्रकार रोखण्यात झाला. यंदा दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाचा वापर करताना ३८ विद्यार्थी आढळले. त्यांची चौकशी सुरू आहे, असेही डेरे यांनी सांगितले. वर्ष व निकालाची वाढलेली टक्केवारीवर्ष उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारीमार्च-२०१० १ लाख ७ हजार ७९६ ७४.९६मार्च-२०११ ८४ हजार ८०८ ५८.५०मार्च-२०१२ ९९ हजार ९०१ ७१.३६मार्च-२०१३ १ लाख १५ हजार ८१.१८मार्च-२०१४ १ लाख २८ हजार ११३ ८७.०६