शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे असणारे मंजूर लाभधारक वंचित

By admin | Updated: July 20, 2014 00:35 IST

मानवत : तालुका कृषी कार्यालयात मानव विकास योजनेतील तुषार संचाचा शेततळे असणारा मंजूर लाभधारक योजनेपासून वंचित आहेत.

मानवत : तालुका कृषी कार्यालयात मानव विकास योजनेतील तुषार संचाचा शेततळे असणारा मंजूर लाभधारक योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे तुषार संचाच्या वाटपाच्या निकषांनाही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आणि तुषार संचाचे मनमानी वाटप करण्यात आले. या वाटपात तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तताही पाळण्यात आली.मानवत तालुका कृषी कार्यालयांतर्गत मानवत व रामेटाकळी हे दोन कृषी मंडळे आहेत. त्यातील मानवत कृषी मंडळाचे मंडळ अधिकारी मागील अनेक वर्षांपासून मानवत मंडळाचा कारभार पाहतात. मानवतसाठी अगोदर पाथरी तालुका होता. त्यावेळी मानवतमधील गावांचा कारभार विद्यमान मंडळ कृषी अधिकारी पाहत होते. पाथरी तालुक्याच्या विभाजनानंतर सेलू तालुका झाला. त्यावेळीही सेलू तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून मानवत परिसरातील गावे त्यांच्याकडेच होती. त्यानंतर मानवत तालुका निर्माण झाला आणि हे मंडळ अधिकारी तेव्हापासून येथेच कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार कोणताही अधिकारी एका जागेवर किंवा कार्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहू नये. परंतु हे अधिकारी एकाच परिसरात जास्त काळ सेवा देत असल्याने येथील शेतकरी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते यांचा त्यांना चांगला अभ्यास झाला आहे. शिवाय नेत्यांसोबत चांगले संबंध आणि नातलगांचा गोतवाळा यामुळे या अधिकाऱ्यांनी काहीही केले तरी धकून जाते. त्यामुळे हे अधिकारी निर्ढावून जाऊन मनमानी पद्धतीने कारभार करीत असतात. कार्यालयात नवीन आलेला तालुका कृषी अधिकारी त्यांचा दरारा पाहून त्यांची साथसंगत करतो आणि आपले काहीच वाकडे होणार नाही, या आर्विभावात वागतो. ‘लोकमत’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तालुक्यातील तुषार संचाच्या मंजूर लाभधारकांना आपल्या नावे तुषार संच मंजूर झाल्याचे कळाले. त्यापैकी एक जण तर तुषार संचासाठी असणाऱ्या निकषांना पात्र ठरणारा होता. परंतु त्याला तुषारसंच न मिळता त्याच्या नावावरील तुषारसंच दुसऱ्यास देण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून तालुका कृषी कार्यालयातील मनमानी कारभाराबाबत तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. (वार्ताहर)अन्याय झाल्याची भावना