शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
4
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
5
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
6
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
7
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
8
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
9
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
10
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
11
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
12
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
13
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
14
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
15
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
16
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
17
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
18
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
19
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
20
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांची दांडी; शेतकर्‍यांची गैरसोय

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते.

राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते. अत्यंत महत्वाच्या असणार्‍या या यंत्रणेला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली असून, ग्रामसेवक महिना- पंधरा दिवस गावातच येत नसल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत काही महिन्यांपासून वाढले आहे. ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्याचा प्रशासनाच्या वतीने विकास करण्याची जबाबदारी खर्‍या अर्थाने ग्रामसेवक यंत्रणेवर आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींकरिता ६६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात तीन विस्तार अधिकार्‍यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. असे असताना मुख्यालयाचे वावडे, परजिल्ह्यातून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे. सरासरी दोन ते तीन गावचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असताना ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. परजिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात महिना-महिना येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक महाशय केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर आहेत. या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, कायम गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनच पाठबळ देत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे. या प्रकारामुळे सातत्याने गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकाचे मनोधेर्ये वाढले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा वरिष्ठांची भीती राहिलेली नाही. या संदर्भात सेनगावचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांना विचारले असता, एखाद्या ग्रामसेवकाची पंचायत समितीकडे तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात आले. अनेकवेळा गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून त्यांच्या वेतनकपात व प्रशासकीय कार्यवाहीचे प्रस्ताव जि.प.च्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.