शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सणाच्या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्काराचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:47 IST

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

ठळक मुद्दे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात.त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अथवा महाराष्ट्र दिनी घेतल्या जाणार्‍या ग्रामसभा वादळी ठरलेल्या आहेत. अनेक वेळा दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व खोटे गुन्हेही दाखल केले जातात. ग्रामसेवकांना जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे येत्या २६ जानेवारी आयोजित राज्यभरातील ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की,राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद आम्हालाही घेता आला पाहिजे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा ही सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्टदरम्यान घेणे अपेक्षित आहे. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचांनी ठरवून दिलेल्या तारखेत अर्थात नोव्हेंबर अखेर घेतली पाहिजे. चौथी ग्रामसभा ही २६ जानेवारी रोजी घेण्याच्या सूचना असतात; पण तो दिवस हा प्रजासत्ताक दिन असून राष्ट्रीय सण आहे. या दिवशी केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सुटी असते.

राष्ट्रीय सणाच्या सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही घेता आला पाहिजे. ध्वजारोहण आटोपल्यानंतर त्या दिवशी आयोजित केली जाणारी ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची राज्य कार्यकारिणीची मागणी आहे. राष्ट्रीय सणाचे महत्त्व कायम राहावे. या दिवशी गावात शांतता, समता, बंधूता व सलोख्याचे वातावरण कायम टिकून राहावे यासाठी २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी आयोजित केल्या जाणार्‍या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. 

ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थितीया संदर्भात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष रमेश मुळे यांनी सांगितले की, आम्ही आज सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना निवेदन सादर केले आहे. २६ जानेवारी, १ मे व १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम निर्विघ्न पार पाडून त्या दिवशी ग्रामसभा घेणार नाहीत. अन्य कोणत्याही दिवशी ग्रामसभा घेण्यास आमची हरकत नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद