धान्य गावात पोहचलेच नाही

By Admin | Updated: September 4, 2015 00:26 IST2015-09-04T00:26:52+5:302015-09-04T00:26:52+5:30

जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानासाठी घेतलेले धान्य पंधरा दिवसानंतरही गावात न पोहचल्याने चर्चेला उधाण आले आहे.

The grain has not reached the village | धान्य गावात पोहचलेच नाही

धान्य गावात पोहचलेच नाही


जामवाडी : जालना तालुक्यातील जामवाडी येथील स्वस्तधान्य दुकानासाठी घेतलेले धान्य पंधरा दिवसानंतरही गावात न पोहचल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे १३ आॅगस्ट २०१५ रोजीच जालना शहरातील नूतन वसाहत भागातील गोदामातून संबंधित दुकानदाराने ६७ क्विंटल धान्य ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
विविध योजनांचे ग्रामस्थांसाठी वितरण करण्यासाठी गहू ४०.५६ क्विंटल (८१ पोते), तांदूळ २७. ५६ क्विंटल(६५पोते) संबंधित दुकानदाराने उचलल्याचे तालुका पुरवठा अधिकारी नंदू दांडगे यांनी सांगितले. सोमनाथ जळगाव येथील शिवाजी गायकवाड यांच्या दुकानाशी जामवाडीचे दुकान जोडण्यात आलेले आहे. पंधरा दिवसानंतही धान्य रेशनधारकांना न मिळाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. एवढे मोठे धान्य गेले कोठे असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्वस्तधान्य दुकानदार गायकवाड म्हणाले, आपल्या दुकानाशी इतर गावातील दुकानेही जोडण्यात आलेली आहेत. हे धान्य दुसऱ्या गावात गेले का याची चौकशी करावी लागेल. तहसीलदार रेवणनाथ लबडे म्हणाले, गोदामातून धान्य संबंधित दुकानदारास देण्यात आले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कडक करवाई करण्यात येईल.

Web Title: The grain has not reached the village