शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांना राजकीय अभय

By admin | Updated: May 28, 2014 00:25 IST

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.

रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्‍या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. या वाळू तस्करांना राजकीय अभय मिळत असल्याने तस्करांचे काहीही वाकडे होत नाही या आविर्भावात तस्करी सुरु आहे. अर्थ व्यवस्थेतही मोठी उलटापालट केली आहे. वाळू तस्करांकडे काही काळापूर्वी एक ट्रक होता त्यांची आज मोठ्या संख्येने अत्याधुनिक ट्रकव्दारे वाळू तस्करी सुरु असल्याचे पाहावयास मिळते. संपूर्ण गोदाकाठात सध्या वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. गोदापात्राची पाहणी केली असता गोदापात्र वाळू माफियांनी चाळणी केल्याचे दिसते. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोट आदी यंत्रांच्या सहाय्याने वाळू माफियांनी गोदापात्राचे विद्रुपीकरण केल्याचे पाहावयास मिळते. गोदापात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी तर पूल बांधण्यात आले आहे. ठिकाणी कोठेही वाळू न दिसता आपल्याला आता केवळ माती मिळते. काही महिन्यांपूर्वी याच गोदापात्रात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणार्‍या पोकलँडने मजुराच्या चिमुरड्याचा बळी घेतला. यावेळी अन्य एक बालक गंभीर जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर मोठा गहजब उडाला. कारवाई मात्र शून्य. एवढया मोठया घटनेनंतरही वाळू तस्करी अद्यापही तशीच बिनदिक्कतपणे सुरु आहे. तालुक्यात रात्रीच्या वेळी सर्रास वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करीच्या मार्गाबाबत सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे. महसूल विभागाचीही कारवाई कमी पडत आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाईनंतर काही दिवसांतच कारवाईनंतर वेगाने वाळू तस्कारी होत असल्याचे दिसून येते. महसूल विभाग कारवाईस कमी पडतो की, काय अशी चर्चा आहे. अंबड शहरात रात्री नऊ वाजेनंतर वाळु तस्करी करणारी रिकामी वाहने गोंदी, शहागडे जाताना दिसतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच मध्यरात्रीनंतर हीच वाहने वाळू भरुन जालना, औंरगाबाद शहराकडे जाताना दिसतात. शहरातून जाणारी ही वाहने सामान्य नागरिकांना दिसतात. यातून अनेकदा मोठे तसेच किरकोळ अपघातही होतात. अंबड व घनसावंगी तालुक्यात विस्तीर्ण नदीपात्रे आहेत. यातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. अवैध उपसा करणार्‍यांवर महसूल विभागाने कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे. नदीपात्राचा पर्यावरणदृष्ट्या ºहास होत आहे.