शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे

By admin | Updated: July 9, 2015 00:18 IST

राजेश खराडे , बीड मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत

राजेश खराडे , बीडमध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत मिळवून देण्याकरिता कृषी विभागाने प्रशासनाकडे साकडे घातले असून, ५ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली आहे.मध्यंतरीचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्यातील फळबागायतदारांना बसला होता. त्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे फळबागा संकटात सापडल्या होत्या. यामधूनही बचाव होण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून येथील कृषी विभागाने ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप केले असल्याचे कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले. वाटप केलेल्या रकमेत ३६४५ हेक्टरावर फळबागा आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५८४० फळबागायतदारांना याचा अद्याप लाभ भेटला आहे. तरी जिल्ह्यातील सुमारे ७२६६ शेतकरी मदतीविनाच आहेत. त्यामुळे ४५३९ हेक्टवरील फळबागांवर धोक्याची घंटा आहे.फळबागा जगविण्यासाठी छाटणी, पीक संरक्षण, पुनर्जीवन, कीड व्यवस्थापन करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान पाहता कृषी विभागाने १० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९८ लाख रूपये उपलब्ध झाले होते. उर्वरित ७२६६ फळबागायतदारांकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.