शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी स्त्रोत मिळाले

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़

नांदेड : शहर व परिसराची भिस्त विष्णूपुरी जलाशयावरच अवलंबून आहे़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाण्याचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी मनपाने महत्वाकांक्षी योजना शासनाकडे सादर केली होती़ त्यानुसार, पैनंगगा नदीवरील इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे नंतर नाल्याद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे़ या योजनेसाठी १४़८७ कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळाली आहे़शहराची पाणीपुरवठा योजना गोदावरीवर अवलंबून आहे़ मागील दहा वर्षांत जेव्हा-जेव्हा गोदावरीच्या खोऱ्यात अल्पवृष्टी झाली तेव्हा-तेव्हा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ या काळात जायकवाडी, सिद्धेश्वर व येलदरी या तीन धरणातून पाणी घेण्यात येत होते़ यंदा मात्र या तीनही धरणांत अत्यंत अल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणी मिळण्याची शक्यता कमी झालेली होती़ त्यात विष्णूपुरीमध्येही केवळ ८ दलघमी पाणी राहिले होते़ त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत होते़ या सर्व बाबी लक्षात घेवून २०१५ मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपाने शहरासाठी खात्रीशिर पर्यायी स्त्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने योजना तयार केली होती़ त्यानुसार, इसापूर धरणाचे पाणी कॅनालद्वारे अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथपर्यंत आणण्यात येईल़ त्यापुढे मेंढला नाल्याद्वारे महादेव पिंपळगाव व सांगवी बंधाऱ्यात घेवून सांगवी येथे आसना नदीवर विहिरीचे बांधकाम करुन पम्पींगद्वारे काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणाऱ या योजनेसाठी १४़८७ कोटी रुपयांना शासनाने २६ आॅगस्ट रोजी मान्यता दिली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यानंतर गोदावरी नदी व पैनगंगा नदीवरील विष्णूपुरी व इसापूर धरण हे दोन स्त्रोत कायमचे उपलब्ध होणार असल्यामुळे शहराला यापुढे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही़ या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़ पी़ सावंत, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महापौर अब्दुल सत्तार, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी प्रयत्न केले़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी बंधाऱ्याने तळ गाठल्यावर शहरात पाणी कपात करण्यात येते़ वेळप्रसंगी सिद्धेश्वर, येलदरी येथून पाणी आणावे लागते, परंतु आता पैनगंगेवरील इसापूर धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे़