शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने मुलीची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:29 IST

आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती.

सोयगाव (औरंगाबाद) : प्रेमप्रकरणाच्या संशयातून बनोटी(वाडी) येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला शुक्रवारी दुपारी मुलाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. प्रेमाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने या मुलीने विषारी द्रव्य प्राशन केले. तिचा आज शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. 

दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव आहे. ती बनोटी येथे दहावीची परीक्षा देत होती. शुक्रवारी वाडी गावातीलच कैलास छोटू सोनवणे याच्यासह रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृतीबाई गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे, आशाबाई बापू सूर्यवंशी(सर्व रा.वाडी, बनोटी) यांनी दिव्याच्या घरी कोणी नसताना घरात प्रवेश केला. कैलास सोबत तुझे प्रेमप्रकरण असल्याचा जाब विचारत सर्वांनी तिला बेदम मारहाण केली. प्रेमप्रकरणाचा संशय आणि मारहाण असह्य झाल्याने दिव्याने विषारी द्रव्य प्राशन केले.   

यानंतर तिला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आज पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर दिव्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तिचा मृतदेह पोलीस स्थानकात ठेवला. आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली. 

पोलिसांनी तत्काळ मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून  कैलास छोटू सोनवणे( २१), रंजनाबाई गोटू सोनवणे, जागृती गोटू सोनवणे, सरलाबाई छोटू सोनवणे या चार आरोपींना अटक केली आहे. सरलाबाई छोटू सोनवणे हिची प्रकृती खालावल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आशाबाई सूर्यवंशी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक शरद रोडगे, योगेश झाल्टे, सुभाष पवार, प्रदीप पवार, संदीप चव्हाण, वैशाली सोनवणे, महिला गृहरक्षक दलाच्या आशाबाई पाटील करत आहेत.