घुगी, लासोना गावच्या पाणी योजनेस मंजुुरी

By Admin | Updated: September 2, 2014 01:50 IST2014-09-02T00:43:33+5:302014-09-02T01:50:53+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील घुगी, लासोना गावच्या वाढीव दरडोई खर्च असलेल्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून, दोन्ही गावच्या योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी, ४९ लाख, ३४५१ रूपयांचा

Ghogi, Laskona village's water scheme approval | घुगी, लासोना गावच्या पाणी योजनेस मंजुुरी

घुगी, लासोना गावच्या पाणी योजनेस मंजुुरी


उस्मानाबाद : तालुक्यातील घुगी, लासोना गावच्या वाढीव दरडोई खर्च असलेल्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली असून, दोन्ही गावच्या योजना पूर्ण करण्यासाठी १ कोटी, ४९ लाख, ३४५१ रूपयांचा निधीच्या ढोबळ किंमती अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे़
जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील घुगी येथील ४१४१ रूपये वाढीव दरडोई खर्च व लासोना येथील ३४१४ रूपये दरडोई खर्च वाढीमुळे पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता़ त्यानुसार शासनाकडून सोमवारी या योजनांना मंजुरी देत अध्यादेश काढण्यात आला आहे़ घुगी गावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ६९ लाख, ३८ हजार ९९ रूपये तर लासोना गावातील योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ७९ लाख ६५ हजार ३५२ रूपयांचा निधीच्या ढोबळ अंदाजपत्रक, आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ या योजनेचे काम ग्रामपंचायत किंवा ग्राम पाणीपुरवठा समितीच्या मार्फत करण्यात येणार आहे़ शिवाय या योजनेच्या वाढीव खर्चास मंजुरी मिळणार नसून, मंजूर किंमतीतच काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
या योजनेवरील खर्च जिल्हा परिषदेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे़ तसेच योजनेची कामे टप्प्या-टप्प्याने व निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याबाबत बजावले असून, उद्भव विकसित झाल्याशिवाय इतर कामे करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत़ शिवाय ही योजना स्वयंनिर्भर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत गावातील नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी, असे कक्षाधिकारी सु़दे़आंबेकर यांनी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Ghogi, Laskona village's water scheme approval