गवंडगावच्या गारपीटग्रस्तांच्या यादीतून वगळले

By Admin | Updated: May 13, 2014 01:04 IST2014-05-13T00:03:44+5:302014-05-13T01:04:04+5:30

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले.

Gavanggoan hailstorm excluded from the list | गवंडगावच्या गारपीटग्रस्तांच्या यादीतून वगळले

गवंडगावच्या गारपीटग्रस्तांच्या यादीतून वगळले

देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्‍यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले आणि अन्य लोकांचा यादीत समावेश केल्याची तक्रार गवंडगाव ता़ देगलूर येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे़ देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष पाटील गवंडगावकर यांच्या नेतृत्वाखाली गवंडगाव येथील ग्रामस्थांनी देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर यांना नुकतेच निवेदन दिले़ त्यानुसार गावातील रबी पिके असणार्‍या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत नसून कापूस व अन्य प्रकारची पिके घेतलेल्या अनेक शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत़ वास्तविक पाहता मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने गवंडगाव व परिसरात रबी ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना गवंडगावच्या तलाठ्याने प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी न करता घरबसल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची यादी तयार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचा पुन्हा सर्वे करून वंचित राहिलेल्या लाभधारकांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Gavanggoan hailstorm excluded from the list