आगीत गॅस कार्यालय खाक

By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-05T00:15:22+5:302015-01-05T00:38:39+5:30

परळी : शहरातील नाथरोडवरील गॅस कंपनीच्या कार्यालयास शनिवारी आग लागून लाखोंचे नुकसान झाले. डॉ. श्रीपाद बुरकूले यांचे वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्यूटर्स या नावाने कार्यालय आहे.

Gas office blaze in the fire | आगीत गॅस कार्यालय खाक

आगीत गॅस कार्यालय खाक


परळी : शहरातील नाथरोडवरील गॅस कंपनीच्या कार्यालयास शनिवारी आग लागून लाखोंचे नुकसान झाले.
डॉ. श्रीपाद बुरकूले यांचे वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्यूटर्स या नावाने कार्यालय आहे. तेथे शेगड्या, सुरक्षा पाईप, ट्रॉली विक्रीसाठी ठेवलेले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयास आग लागली. अग्निशमन जवानांनी आग नियंत्रणात आणली. फर्निचर, गॅस साहित्य जळून खाक झाले. दहा लाखांचे नुकसान झाल्याचे बुरकूले यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
टाक्या नव्हत्या म्हणून..!
गॅसच्या टाक्या कन्हेरवाडी येथील गोदामात ठेवलेल्या होत्या तर नाथरोडवरील कार्यालयात केवळ किरकोळ साहित्य विक्रीसाठी ठेवलेले होते. कार्यालयात गॅसच्या टाक्या नव्हत्या, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (वार्ताहर)

Web Title: Gas office blaze in the fire