शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:31 IST

येथील पोलीस वसाहतीतील एका निवासस्थानात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला़ दरम्यान पोलीस कर्मचाºयाने सतर्कता दाखवित शेगडीसह गॅस सिलिंडर घराबाहेर नेऊन टाकल्याने मोठा अनर्थ टळला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पोलीस वसाहतीतील एका निवासस्थानात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला़ दरम्यान पोलीस कर्मचाºयाने सतर्कता दाखवित शेगडीसह गॅस सिलिंडर घराबाहेर नेऊन टाकल्याने मोठा अनर्थ टळला़पोलीस वसाहतीमध्ये प्रभावती शाळेच्या गेटजवळ पोलीस कर्मचारी भानुदास पवार यांचे वाय ९ या क्रमांकाचे निवासस्थान आहे़ ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पवार यांच्या घरी स्वयंपाक सुरू होता़ यावेळी स्वत: भानुदास पवार, त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे सर्वच कुटुंबिय घरात होते़ भानुदास पवार हे अलीकडच्या खोलीत असताना स्वयंपाक घरात काही तरी आवाज झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ आत जाऊन पाहिले असता सिलिंडरने पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ रेग्युलेटर बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ परंतु, ते जॅम झाले होते़ त्यामुळे सतर्कता दाखवित पवार यांनी शेगडीसह सिलिंडर घराच्या बाहेरील अंगनात नेवून टाकले़ घरातील सर्व सदस्यांना बाहेर काढले़ काही वेळातच सिलिंडरचा मोठा स्फोट झाला़ हा स्फोट एवढा मोठा होता की, सिलिंडरचे दोन तुकडे झाले. स्फोटाचा आवाज दीड किमी अंतरापर्यंत पोहोचेल एवढा मोठा होता़ या घटनेमुळे संपूर्ण पवार कुटुंबिय घाबरून गेले होते़ दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले़ परभणी शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल सांगळे, यांच्यासह डीएसबीचे मुजमुले, नितीन वडकर, गणेश पुरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून आले़ या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ पवार यांच्या सतर्कतेमुळेच मोठा अनर्थ टळला़