शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

गराडा आरोग्य उपकेंद्राचा झाला गोठा

By admin | Updated: May 19, 2014 01:32 IST

सुरेश चव्हाण, कन्नड कन्नड तालुक्यातील गराडा येथील आरोग्य उपकेंद्राचे सन १९९८-९९ साली बांधकाम करण्यात आले;

 सुरेश चव्हाण,  कन्नड कन्नड तालुक्यातील गराडा येथील आरोग्य उपकेंद्राचे सन १९९८-९९ साली बांधकाम करण्यात आले; मात्र आज या इमारतीचा ताबा चारा साठवणुकीने घेतला आहे. केवळ इमारतीची दुरुस्ती होत नसल्याने या इमारतीची दुरवस्था झाली आहे. माणसांच्या दवाखान्यात गुरांचा चारा पाहून गावकरीही आश्चर्य व्यक्त करीत असले तरी आरोग्य विभागाला याचे गांभीर्य दिसून आलेले नाहीे. शहरापासून सहा कि.मी. अंतरावर गराडा हे गाव आहे. हे गाव आता चिकलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येते. या ठिकाणी सन १९९८-९९ साली आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली. तथापि, त्यावेळी सदर इमारत गावाबाहेर होती. इमारतीच्या आजूबाजूस लोकवस्ती नसल्याने उपकेंद्राचा कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास नव्हता; मात्र हळूहळू गावाची हद्दवाढ झाली. इमारतीच्या आजूबाजूस लोकवस्ती झाली आहे. तथापि, इमारत दुरवस्थेत आहे. इमारतीचा लाकडी दरवाजा चोरीस गेला आहे. फरशी फुटलेली आहे. इमारतीच्या काही खोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी सुटलेली आहे, तर उपकेंद्राच्या नैऋत्य भागाकडील दोन खोल्यांमध्ये चक्क मक्याचा चारा साठविण्यात आला आहे. उपकेंद्राच्या इमारतीस संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी जनावरांचा वावर आहे. अशा अवस्थेमुळे हे उपकेंद्र कार्यान्वित नाही. गराडा येथील उपकेंद्राची इमारत १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहे; मात्र सध्या या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे गरज नसताना दुरुस्ती दाखवली जात आहे. परिपूर्ण प्रस्ताव नसताना निधी मंजूर करण्यात आला आहे. दरवाजे, खिडक्या बसवून उपकेंद्र चालू करणे गरजेचे आहे, की गरज नसताना केवळ अधिकारी व पदाधिकारी यांचे खिसे भरण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली शासकीय रकमेचा गैरवापर करणे योग्य आहे? या प्रकरणात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जि.प. सदस्या संगीता चव्हाण यांनी दिली. लसीकरण नाही, कर्मचार्‍यांबाबत वाढत्या तक्रारी गराडा उपकेंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये लसीकरण वेळेवर होत नाही. याबाबत तक्रार करूनही उपयोग होत नाही. या उपकेंद्रातील आरोग्य सेविकेच्या मोठ्या तक्रारी आहेत. उपकेंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत प्रस्ताव दाखल केलेला असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.