शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड विधानसभेत सर्वाधिक मते

By admin | Updated: May 23, 2014 01:10 IST

उद्धव चाटे, गंगाखेड विधानसभा मतदार संघातून ओबीसी मतदारांनी आ. बंडू जाधव यांना भरभरून मताधिक्य देऊन शिवसेनेची आघाडी वाढविण्यासाठी सहकार्य केले.

 उद्धव चाटे, गंगाखेड गंगाखेड विधानसभा मतदार संघातून ओबीसी मतदारांनी परभणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आ. बंडू जाधव यांना भरभरून मताधिक्य देऊन शिवसेनेची या मतदार संघातील आघाडी वाढविण्यासाठी सहकार्य केले. या मतदार संघातील जनता लोकसभेचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे आपल्या मतदानातून दाखवून दिले. पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी वर्णी लागावी यासाठी मतदारांनी एकवटून मतदान केले. गंगाखेड विधानसभा मतदार संघात युतीला नेहमीच भरभरून मते मिळतात. याहीवेळी मतदारांनी आपले मत हे निर्णायक ठरविले. गंगाखेड तालुका हा अर्धाअधिक डोंगराळ भाग असून ओबीसी मतदारांची संख्या अधिक आहे. या मतदार संघातून नेहमीच मताधिक्य मिळते. परंतु निवडून येणारे युतीचे खासदार या भागाकडे लक्ष देत नाहीत. यावेळी मात्र आ. बंडू जाधव यांना निर्णायक मते देऊन विकासाच्या अपेक्षा मतदारांनी बाळगल्या आहेत. कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे व महायुतीचे उमेदवार आ. बंडू उर्फ संजय जाधव या दोघातच खर्‍या अर्थाने लढत झाली. गंगाखेड या मतदार संघात महायुतीचे खा. गोपीनाथ मुंडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारा गट मोठा आहे. म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. तसेच महायुतीचे सदस्य व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन गंगाखेड विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य दिले. गंगाखेड मतदार संघातील ५४ हजारांचे मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले. एका गावात चार ते पाच वेळेस भेटी दिल्या. हा विजय आमचा नसून जनतेचा विजय आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ मतदारांनी दिल्लीत पाठविला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटे आणि भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मुंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.