ेग्रा.पं.कार्यालयावर काढला घागर मोर्चा

By Admin | Updated: June 17, 2014 00:39 IST2014-06-17T00:28:07+5:302014-06-17T00:39:51+5:30

कडोळी : येथील वॉर्ड क्र. १ मधील दलितवस्तीत असलेल्या बोअरच्या दुरूस्तीबाबत माहिती देवूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. या निषेधार्थ सोमवारी सकाळी या भागातील रहिवाशांनी

Gagar panchayat removed the office on the eve | ेग्रा.पं.कार्यालयावर काढला घागर मोर्चा

ेग्रा.पं.कार्यालयावर काढला घागर मोर्चा

कडोळी : येथील वॉर्ड क्र. १ मधील दलितवस्तीत असलेल्या बोअरच्या दुरूस्तीबाबत माहिती देवूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. या निषेधार्थ सोमवारी सकाळी या भागातील रहिवाशांनी ग्रा. पं. कार्यालयावर घागर मोर्चा काढला.
गावामध्ये फिरून विविध प्रकारचे नारे देत माधव इंगोले, भागवत डोंगरे, के. डी. देशमुख, गुहाडे, धम्मा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा. पं. कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर उपसरंपच संतोष गुडदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लवकर पाण्याची सोय नाही केली तर १८ जून रोजी ग्रा. पं. ला कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच या प्रश्नाकडे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कडोळी ग्रा. पं. ला भारत निर्माण अंतर्गत मिळालेल्या नळयोजनेला एक वर्षे पुर्ण होवून सुद्धा कुठल्याही प्रकारे गावकऱ्यांना या योजनेचा फायदा झालेला नाही. या अगोदर बऱ्याच वेळा ग्रा. पं. सदस्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून सुद्धा याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. (वार्ताहर)

Web Title: Gagar panchayat removed the office on the eve