पोलिसांना तपास कामासाठी फंड

By Admin | Updated: October 26, 2015 23:56 IST2015-10-26T23:56:42+5:302015-10-26T23:56:42+5:30

बीड : पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करावे लागत असे. बहुतांश वेळा खर्चासाठी फिर्यादीची मदत घ्यावी लागत असे

Fund to investigate the police | पोलिसांना तपास कामासाठी फंड

पोलिसांना तपास कामासाठी फंड

 

बीड : पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करावे लागत असे. बहुतांश वेळा खर्चासाठी फिर्यादीची मदत घ्यावी लागत असे. परंतु आता शासनाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना तपास कामासाठी स्वतंत्र २५ लाखांचा फंड आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर या संदर्भात बोलताना म्हणाले की, २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे २०१३ मध्येच तपास कामासाठी फंड आला होता. त्यानंतर यावर्षी तपास कामासाठी लागणारा फंड आला आहे. २५ लाख रूपयांचा फंड तपास कामावर खर्च केला जाणार आहे. आतापर्यंत तीन ते चार लाख रूपये फंड तपासकामासाठी खर्चीला गेला आहे. एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीपर्यंत हा फंड वापरला जाऊ शकणार आहे. तपासासाठी गाडी भाड्याने घेऊन जाणे, खाण्यापिण्याचा खर्च, साहित्य, व्हिडीओग्राफी, झेरॉक्स, स्टेशनरी यासाठी फंड वापरला जाईल. पोलीस अधिकारी, कर्मचारी तपास कामी गेले असता ज्या ठिकाणी त्यांनी जेवण केले आहे, राहिले आहे, गाडी भाड्याने केलेली असल्यास त्याच्या पावत्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अधीक्षक कार्यालयास पाठविल्यानंतर तो मंजूर केला जाईल. जिल्ह्यातील २७ पोलीस ठाण्यांना हा फंड विभागून दिला असून, प्रत्येक ठाण्याला ७० ते ८० हजार रूपये तपास कामावर होणाऱ्या खर्चासाठी मिळतील, असेही अधीक्षक पारसकर म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Fund to investigate the police