‘फुकट्या’ प्रवाशांकडून दीड लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: January 30, 2015 00:50 IST2015-01-30T00:33:13+5:302015-01-30T00:50:55+5:30

बीड : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे समजले जाते, मात्र या एसटीलाच फसविणारे अनेक महानग आहेत.

'Fukta' passengers recover 1.5 lakh fine | ‘फुकट्या’ प्रवाशांकडून दीड लाखांचा दंड वसूल

‘फुकट्या’ प्रवाशांकडून दीड लाखांचा दंड वसूल


बीड : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे समजले जाते, मात्र या एसटीलाच फसविणारे अनेक महानग आहेत. खिशात पैसे असून सुद्धा फुकटचा प्रवास करणाऱ्या २८२ प्रवाशांकडून दीडलाखाच्या वर प्रवासभाडे व दंड वसुल केला आहे.
जिल्ह्यात रापमच्या सुमारे सहाशेच्यावर बसगाड्या धावतात. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे यावर्षी रापमला गतवर्षी पेक्षा १५ कोटीने अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र ही वाढ अपेक्षेप्रमाणे नाही. कारण आजही अनेक प्रवाशी बसमध्ये फुकटचाच प्रवास करणे पसंत करतात.
एप्रील ते डिसेंबर २०१४ या दरम्यानच्या कालावधीत महामंडळातील लाईन चेकींग पथकाने २८२ प्रवाशांकडून दंड वसुल केला आहे. यामध्ये एक लाख ५३ हजार ८७१ रूपये प्रवास भाडे वसुल केले असून २५ हजार ४४३ रूपयाचा दंड वसुल केला आहे. विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक, विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, यंत्र अभियंता आर.एन.बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षकांनी हा दंड वसूल केला़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Fukta' passengers recover 1.5 lakh fine