-संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर :सिगारेटला ‘कूल’ पद्धतीने ‘गुडबाय’ म्हणण्यासाठी तरुणाईने हातात घेतलेले निकोटिन च्युइंगम आता अनेकांसाठी ट्रेंडपेक्षा ट्रॅप ठरत आहे. हातातली सिगारेट खाली ठेवण्यासाठी तोंडात घेतलेले ‘निकोटिन गम’च आता काहींच्या आयुष्यात नवे व्यसन बनत आहे. व्यसनमुक्तीचा आधार म्हणून सुरू झालेली ही सवय, नकळतच निकोटिनच्या जास्त प्रमाणामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास वाढवते आहे.
शहरात सिगारेट सोडण्यासाठी निकोटिन च्युइंगमचा वापर वाढत आहे. चिंताजनक म्हणजे, अनेकांमध्ये त्याचा अतिवापर तितक्याच वेगाने वाढतो आहे. काही जण दिवसाला २० ते २५ च्युइंगम खात आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. कॉलेज कॅम्पसपासून कॅफेपर्यंत, तोंडात च्युइंगम ठेवणे, ही नवी स्टाईल बनली आहे. मात्र, यामागचे सत्य अनेकांना माहिती नाही. एका च्युइंगममध्ये चार सिगारेटइतका निकोटिन डोस देत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
शरीरावर काय परिणाम?निकोटिनचे प्रमाण वाढल्यास चिंता, अस्वस्थता, नाहक भीती, चिडचिड, झोप न लागणे अशा तक्रारी वाढतात. काही रुग्णांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, तसेच रक्तदाबात चढउतारही दिसून येतात. त्यामुळे व्यसन सोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या च्युइंगमचा वापर करताना मर्यादा आणि वैद्यकीय मार्गदर्शन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
निकोटिन गममध्ये काय असते?निकोटिन गम हे धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी वापरले जाणारे निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी (एनआरटी)चे प्रभावी साधन असून, यात निकोटिन पोलाक्रिलेक्स हा मुख्य सक्रिय घटक असतो. हा निकोटिनचा नियंत्रित आणि शुद्ध प्रकार असून, चघळताना तो तोंडातून हळूहळू शरीरात शोषला जातो आणि सिगारेटची तल्लफ कमी करण्यास मदत करतो. तंबाखू नसतानाही निकोटिन असल्यामुळे या गमचे अतिसेवन टाळणे आवश्यक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापर करणे गरजेचे आहे.
एक निकोटिन च्युइंगम चार सिगारेटइतके घातकसिगारेट सोडण्यासाठी अनेक जण निकोटिन च्युइंगमचे सेवन करतात, परंतु काहींना याचे व्यसन लागते. एका निकोटिन च्युइंगममध्ये २ एमजी निकोटिन असते, तर एका सिगारेटमध्ये ०.५ एमजी निकोटिन असते. त्यामुळे एक च्युइंगम चार सिगारेटइतके निकोटिन देते. त्यातूनच चिंता, अस्वस्थता, नाहक भीती इ. त्रास रुग्णांना उद्भवतात. हे च्युइंगम डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. स्वत:च्या मनाने घेऊ नये.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकार तज्ज्ञ
Web Summary : Nicotine gum, used to quit smoking, is becoming addictive for youth. One gum contains nicotine equivalent to four cigarettes, causing anxiety and health issues. Doctors advise caution and medical guidance.
Web Summary : सिगरेट छोड़ने के लिए इस्तेमाल किया जाने वाला निकोटीन गम युवाओं के लिए लत बनता जा रहा है। एक गम में चार सिगरेट के बराबर निकोटीन होता है, जिससे चिंता और स्वास्थ्य समस्याएं होती हैं। डॉक्टर सावधानी और चिकित्सा मार्गदर्शन की सलाह देते हैं।