बेरोजगारांसाठी मोफत प्रशिक्षण

By Admin | Updated: June 17, 2014 00:52 IST2014-06-17T00:46:55+5:302014-06-17T00:52:27+5:30

नांदेड : स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, नाबार्ड तसेच शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी

Free training for unemployed | बेरोजगारांसाठी मोफत प्रशिक्षण

बेरोजगारांसाठी मोफत प्रशिक्षण

नांदेड : स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, नाबार्ड तसेच शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी १६ जून ते ३१ मार्च २०१५ पर्यंत विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे़
या प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडताना आवड, शारीरिक क्षमता, आर्थिक मागासलेपण लक्षात घेतले जाते़ शिवाय तो ग्रामीण भागातीलच रहिवासी असणे अपेक्षित आहे़ दरम्यान मुलाखतीनंतर या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांना प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या प्रकल्पाचे संचालक जयंत वरणकर म्हणाले, ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो़ १६ जूनपासून मल्टीफोन सर्व्हिसींग (मोबाईल रिपेअरींग) प्रशिक्षण सुरू होणार आहे़ त्याचा कालावधी ३० दिवसांचा असेल़
प्रवेशपात्र प्रशिक्षणार्थींना पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी रहावे लागेल़ इच्छुकांनी ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड पैकी एक), शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवासी दाखला, उमेदवार दारिद्रय रेषेखालील असेल तर त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे सात छायाचित्रे आणावे़ दरम्यान, १७ जुलैपासून इलेक्ट्रीक उपकरणे दुरूस्ती, १८ आॅगस्टपासून ड्रेस डिझायनिंग फॉर जेन्टस् (टेलरींग), ९ सप्टेंबरपासून गृहोपयोगी वस्तू बनविणे, २४ सप्टेंबरपासून नळ व पाईपलाईन दुरूस्ती, २८ आॅक्टोबरपासून दूग्ध व्यवसाय व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण, १४ नोव्हेंबरपासून महिलांसाठी आर्टीफिशियल फ्लॉवर मेकींग, १ डिसेंबरपासून युवकांसाठी बेसिक कॉम्प्युटर, ३ जानेवारीपासून महिलांसाठी दूग्धव्यवसाय व गांडूळ खत निर्मिती, १६ जानेवारीपासून ग्रामीण उद्योजक विकास कार्यक्रम, ३० जानेवारीपासून बेसिक फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी, २३ फेब्रुवारीपासून महिलांसाठी मेणबत्ती बनविणे तर २ मार्चपासून युवकांसाठी मोटरसायकल दुरूस्ती प्रशिक्षण होणार आहे़ (प्रतिनिधी)
आजपासून मोबाईल रिपेअरींगचे प्रशिक्षण सुरू होणार
१७ जुलैपासून घरगुती इलेक्ट्रीक उपकरणे दुरूस्ती प्रशिक्षण
१८ आॅगस्टपासून ड्रेस डिझायनिंग फॉर जेन्टस् (टेलरींगचे प्रशिक्षण)
९ सप्टेंबरपासून गृहोपयोगी वस्तू बनविणे
२४ सप्टेंबरपासून नळ व पाईपलाईन दुरूस्ती,
ग्रामीण युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास- भोजनाची मोफत सुविधा

Web Title: Free training for unemployed