शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी साडेचार हजार उमेदवार

By admin | Updated: June 4, 2014 01:32 IST

उस्मानाबाद : येथे ६ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ४ हजार ६८१ उमेदवारांनी आवेदनपत्र भरली आहेत.

उस्मानाबाद : येथे ६ जून पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत असून, यासाठी ४ हजार ६८१ उमेदवारांनी आवेदनपत्र भरली आहेत. दरम्यान, ही भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसारच होणार असून, कोणीही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. तसेच या भरती प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंब करणार्‍या उमेदवार व इतर इसमांविरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपायांच्या १४० पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी ३ हजार ९८० पुरूष आणि ७०१ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान समाजातील काही दलाल अगर तत्सम व्यक्ती उमेदवारांना भरतीचे खोटे आमिष दाखवून पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची ओळख असल्याचे सांगून उमेदवारांची फसवणूक करण्याची शक्यता असते. परंतु, भरतीची प्रत्येक प्रक्रिया पारदर्शक व शासकीय नियमानुसार काटेकोरपणे होणार आहे. यात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी, ओळखीला थारा राहणार नाही. त्यामुळे कोणाच्याही ओळखीला अथवा आमिषाला बळी पडू नये, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी) भरती प्रक्रियेत दलालांवर पाळत ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व गुप्तचर विभाग यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हा पोलिस घटकातील गुप्तचर पथकेही नेमण्यात आलेली आहेत. कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय गैरप्रकरात सामील होणार्‍या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असा इशाराही अधीक्षक पाटील यांनी दिला आहे. कोणी आमिष दाखविल्यास येथे साथा संपर्क पोलिस भरतीसाठी आलेले उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणी भरतीसंदर्भात आमिष दाखवीत असेल तर अशा लोकांची माहिती दूरध्वनीवरूनही देता येईल. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय (०२४७२/२२७६२०), अपर पोलिस अधीक्षक (२२०२०), पोलिस उपअधीक्षक (२२७६२२), पोलिस नियंत्रण कक्ष (२२२७००, २२२९००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. तसेच कोणी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दररोज ७५० उमेदवार अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी दररोज ७५० उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलाविण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलवरून कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ याची नियमितपणे खात्री करत जावी, असेही पोलिस अधीक्षकांनी कळविले आहे.