शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

पंचविशीचा तरूण बनला चाळीस मुलांचा बाप

By admin | Updated: May 27, 2014 00:55 IST

प्रताप नलावडे , बीड बहिणीचा अकाली मृत्यू आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली.

प्रताप नलावडे , बीड ेसात महिन्याच्या गरोदर बहिणीचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली. या अस्वस्थतेनेच त्याला प्रेरणा दिली आणि त्यानंतर अवघ्या वर्षभरात तो बनला १० मुलांचा बाप. नऊ वर्षापूर्वी सुरू झालेली अनाथांची ही कहाणी आता ४० मुलांवर येऊन ठेपली आहे. गेवराई येथील संतोष गर्जे या तरूणाने जिद्दीने हा ४० मुलांचा संसार पत्नी प्रीतीसह जिवाच्या कराराने पेलला आहे. अनाथांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याने उचललेले पाऊल आज एक चळवळ बनले आहे. संपूर्ण राज्यभरात संतोषच्या या कामाची आवर्जून दखल घेतली जात आहे. ऊस तोडणी कामगाराचा या मुलाने सुरूवातीच्या काळात अक्षरश: भीक मागून या मुलांचा सांभाळ केला. लोकांनी सुरूवातीला वाट्टेल ते सुनावले परंतु जेव्हा त्यांना त्याच्यातील अंतरिक तळमळ दिसू लागली तेव्हा मदतीचा हातही याच लोकांनी पुढे केला. संतोषच्या या पितृत्वाची कहाणीही चटका लावणारी आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी त्याच्या बहिणीचा अकाली मृत्यू झाला आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीचे पालकत्व त्याच्याकडे आले. तिचा सांभाळ करताना त्याला अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले. यातूनच त्याला अनाथ मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव झाली. खिशात एक रूपयाही नसताना तो विचार करीत होता समाजातील अनाथांचे पितृत्व स्वीकारण्याचा. गावोगाव भटकंती करून त्याने सुरूवातीला वेश्यांची, अकाली पितृत्व हरवलेली, तुरूंगात असणार्‍या कैद्यांची मुले त्याने सांभाळण्यासाठी आपल्याकडे घेतली आणि यातूनच सुरूवात झाली ती सहारा अनाथालय परिवाराची. आई फाऊंडेशनची स्थापना करून त्या मार्फत संतोषने सुरू केलेली ही चळवळ आता ४० मुलांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या संपूर्ण पालनपोषण करण्याची जबाबदारी संतोष पेलत असताना अनेक अडचणीलाही त्याला तोंड द्यावे लागते. अगदी किराणा माल आणण्यापासून त्याला अडचणीला तोंड द्यावे लागते, परंतु पित्याच्या मायेने हा तरूण या सगळ्यांचा सांभाळ करीत आहे. आज बीड, सोलापूर, बार्शीसह विदर्भातील मुलंही त्याच्या अनाथालयात आहेत. त्यांना चांगले शिक्षण देणे आणि स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द संतोष आणि प्रीतीला सतत कार्यरत ठेवते. गेवराईत तीन एकराच्या जागेत संतोषने पत्र्याचे शेड ठोकून आपला हा ४० मुलांचा प्रपंच थाटला आहे. तो स्वत:ही आपल्या पत्नीसह तेथेच राहतो. त्याच्यासह पाच जण मुलांचे संगोपन करतात. ६ ते १८ वयोगटाची या मुलांना सहारा अनाथालय म्हणजे स्वत:चे घरच वाटते. हे तर माणुसकीचे घर गेवराई येथील सहारा अनाथालय माणुसकीचे अनोखे घर बनले आहे. जात-पात आणि धर्मापासून सहारा परिवारातील मुलं कोसो दूर आहेत. वेगवेगळ्या परिसरातून आणि वातावरणातून आलेली ही मुलं इथं अगदी प्रेमानं आणि मायेने राहताना दिसतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही अपघाताने जोडली गेलेली ही नाती जिवापाड सांभाळतात.