शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

‘वर्षभराची नळपट्टी माफ करा’

By admin | Updated: July 13, 2014 00:22 IST

परभणी : शहर महानगरपालिकेने नागरिकांची वर्षभराची नळपट्टी माफ करावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे़

परभणी : शहर महानगरपालिकेने नागरिकांची वर्षभराची नळपट्टी माफ करावी, अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे़ मुबलक पाणी असताना गेल्या दहा महिन्यांपासून नागरिकांना १२ ते १४ दिवसांना वेळी अवेळी पाणीपुरवठा होत आहे़ केवळ मनपाचे नियोजन नसल्याने शहरवासियांना हा त्रास सहन करावा लागत आहे़ पाणीपुरवठा योजनेवर २००८ साली विद्युत पंप लावण्यात आले़ परंतु, या पंपांची दुरुस्ती करण्यासाठी मनपाकडे एकही तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाही़ याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे़ शहरातील जलकुंभ भरले तरीही खाजगी पाणी वाटप करणारे या ठिकाणाहून पाणी घेऊन जातात़ त्यामुळेही पाण्याचा अपव्यय होत आहे़ मनपाच्या नियोजन शून्य धोरणामुळे नागरिकांना १० ते १३ दिवसांना पाणी पुरवठा होऊनही नळपट्टी मात्र एक महिन्याची वसूल केली जात आहे़ तसेच उशिरा नळपट्टी भरणाऱ्यांवर व्याजही लावले जात आहे़ याप्रश्नी राजेश देशमुख यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन एक वर्षाची नळपट्टी माफ करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे़ (प्रतिनिधी)