शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

फूडपार्कच्या प्रस्तावाला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST

औरंगाबाद : वर्षभरापासून ‘डीएमआयसी’च्या बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये ‘फूडपार्क’ उभारण्याच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत. आता ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड’च्या ...

औरंगाबाद : वर्षभरापासून ‘डीएमआयसी’च्या बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये ‘फूडपार्क’ उभारण्याच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत. आता ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड’च्या (एआयटीएल) संचालक मंडळाची बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून, त्या बैठकीसमोर ‘फूडपार्क’चे ‘ले-आऊट, डिझायनिंग, इस्टिमेट व टेंडर’चा खर्च आदींचा प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे. त्यास संचालक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर मार्चअखेरपर्यंत नियोजित ‘फूडपार्क’च्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘मासिआ’च्या वतीने आयोजित ‘ॲडव्हाॅन्टेज महाराष्ट्र एक्स्पो- २०२०’च्या उद्‌घाटन समारंभासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ जानेवारी २०२० रोजी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये ५०० एकरांत अन्नप्रक्रिया उद्योग (फूडपार्क) उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘एआयटीएल’ संचालक मंडळाच्या बैठकीत ‘फूडपार्क’च्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत. तरीही त्याठिकाणी अद्याप एकही ‘अँकर’ प्रोजेक्ट आलेला नाही. किमान ‘फूडपार्क’ला सुरुवात झाली, तर देश किंवा विदेशातील मोठे उद्योग त्याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊ शकतील, असे उद्योगक्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. मात्र, बैठका, घोषणा आणि पाहणी यापलीकडे बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कच्या विकासासाठी शासन -प्रशासन यंत्रणेच्या हालचाली नाहीत.

डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यात ‘एआयटीएल’ संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत ‘फूडपार्क’ उभारण्यासाठी एकमताने मंजुरी मिळाली. त्यावेळी डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निश्चितही झाले होते. आता जानेवारी महिना उलटत आला, तरीही या विषयावर ‘एआयटीएल’ची बैठक झालेली नाही. ‘एआयटीएल’च्या बैठकीत प्रकल्प अहवाल मंजूर झाल्यानंतरच ‘फूडपार्क’मध्ये येणाऱ्या उद्योगांसाठी रस्ते, वीज, पाणी, वेस्ट वॉटर प्रोसेसिंग युनिट उभारणीला कधी मुहूर्त सापडणार.

चौकट..............................

प्रकल्प अहवालाच्या मंजुरीनंतरच पुढचा टप्पा

यासंदर्भात ‘ऑरिक’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, ‘एआयटीएल’च्या बैठकीत डिसेंबरमध्ये फूडपार्कला मंजुरी मिळाली. जानेवारीमध्ये बैठक झाली असती, तर आम्ही त्या बैठकीसमोर फूडपार्कचा प्रकल्प अहवाल सादर केला असता. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत प्रकल्प अहवालास मान्यता मिळाल्यानंतर मार्चअखेरपूर्वी यासंबंधीच्या पुढील टप्प्याला (कामाला) सुरुवात होऊ शकते.