औरंगाबाद : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना शस्त्रासह गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. अंधाराचा फायदा घेऊन एक फरार झाला, तर ५ जणांना न्यायालयासमोर उभे केले असता, ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छावणी येथील गुन्ह्यातील आरोपींच्या शोधात फौजदार सुभाष खंडागळे यांची टीम फिरत असताना तीन मोटारसायकलींवर ६ जण नाशिक हायवेलगत त्रिशूल हॉटेलजवळ दबा धरून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पोलिसांनी झडप घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक फरार झाला; परंतु शेख मोबीन शेख मोहियोद्दीन (२६, रा. कृष्णानगर, नांदेड रोड, लातूर), गिरीश रमेश साळुंके (३०, रा. विश्वासनगर, न्यू कॉटन मार्केट रोड, अमरावती), शेख आमेर शेख इसत्याक (३२, रा. फातेमानगर, हर्सूल), मंगेश मधुकर ठाकरे (२८, रा. पिंपळगाव, बसंत, निफाड, नाशिक), आकाश वसंत चव्हाण (१७, रा. हमालपुरा, रेल्वेस्टेशन, अमरावती), तर पळून गेलेल्या आरोपीचे नाव शेख सलीम (रा. अंबड) असे आहे. आरोपींनी परिसरातून आतापर्यंत जवळपास पन्नास मोटारसायकली पळविल्या असून, त्यांची विक्री केली आहे. त्यांच्याकडून अजून मोठी माहिती उपलब्ध होण्याची शक्यता असून, दोन गाड्याही चोरीच्याच असून त्यावर ते बसून आले होते, असेही चौकशीअंती पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, प्रकाश काळे, नवनाथ परदेशी, शेख जावेद, अशोक नागरगोजे, देवीदास इंदोरे, महेश कोमटवार, अरुण दाभाडे, सुनेश कुसाळे आदींचा सहभाग होता.
घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोरांना अटक
By admin | Updated: November 2, 2014 00:24 IST
औरंगाबाद : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना शस्त्रासह गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोरांना अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}