शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

त्या एजंटला पाच दिवसांची कोठडी

By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणारा एजंट हरिहर बन्सीधर साबळे यास पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बीड बायपास परिसरात अटक केली

औरंगाबाद : सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणारा एजंट हरिहर बन्सीधर साबळे यास पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बीड बायपास परिसरात अटक केली. त्यास शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.सुपर पॉवर कंपनीने अल्पावधीत गुंतवणुकीच्या अडीच ते तीनपट परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यात आणि राज्याबाहेरील गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमा जमा केल्या होत्या. मात्र, करारानुसार कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही, उलट ठिकठिकाणचे कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. याप्रकरणी आरोपीविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुण्यातील मगरपट्टा येथे राहणाऱ्या दीपक आणि दिव्या पारखे पती-पत्नी संचालकांना अटक केली. त्यांना अटक झाल्याची बातमी समोर येताच शेकडो तक्रारदार पुढे आले. यात राज्याबाहेरीलही गुंतवणूकदारांचा समावेश आहे. तसेच अजूनही तक्रारी येतचआहे. दरम्यान, परतूर तालुक्यातील सातोना येथील रहिवासी हरिहर साबळे या एजंटाने तालुक्यातील अनेकांना सुपर पॉवर कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे समोर आहे. फसव्या कंपनीत नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी तो सतत गुंतवणूकदारांच्या घरी जात, त्यांना विविध प्लॅन तो समजावून सांगत असे. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी सुपर पॉवर कंपनीत मोठ्या रकमा गुंतविल्या होत्या. पारखे दाम्पत्याला अटक झाल्यापासून तो मात्र, फरार झाला होता. अटकेनंतर शनिवारी दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले. याप्रसंगी पोलिसांतर्फे युक्तिवाद करण्यात आला की, आरोपीने जमा केलेल्या रकमेतून स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध घ्यावयाचा आहे. तसेच त्याच्या बँक खात्यात किती रक्कम आहे, याबाबतची माहिती घेऊन बँक खाती सील करावयाची आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी किती साथीदार आहेत, याबाबतची माहिती घेण्यासाठी ७ दिवस पोलीस कोठडी मागितली. यावेळी न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.