शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 12:10 PM

शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला.

औरंगाबाद : आधी आम्ही ५० होतो, नंतर १०५ येऊन मिळाले, आगामी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या २०० जागा निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

आ. प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील संपर्क कार्यालयाास सदिच्छा भेट दिल्यानंतर उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. जैस्वाल, आ. संजय सिरसाट, आ. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर काम करत आहोत. आम्ही घेतलेल्या भूमिकेचे स्वागत राज्यातील जनता करत आहे. मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत मालेगावातील नागरिक रस्त्यावर उभे होते. तुमचेही प्रेम तेवढेच असल्याचे या गर्दीवरून दिसते. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे पालकत्व मी स्वीकारले आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ७०० मी.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले. लेबर कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न सोडविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारजिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी क्रांतीचौकात मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ११.२० मुख्यमंत्री तेथे पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला. सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थेचे प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसीच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालShiv Senaशिवसेना