शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अतिक्रमणावर ग्रामपंचायतचा हातोडा

By admin | Updated: May 24, 2014 00:54 IST

शिरूरकासार: शहरात अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले होते. यामुळे रहदारीस अडथळा येत होतो. शिवाय गेल्या काही दिवसात शहरात येणारी बसही येईनाशी झाली होती.

शिरूरकासार: शहरात अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले होते. यामुळे रहदारीस अडथळा येत होतो. शिवाय गेल्या काही दिवसात शहरात येणारी बसही येईनाशी झाली होती. यामुळे ग्रामपंचायतने ठराव घेऊन शुक्रवारी अतिक्रमणावर हातोडा चालविला. येथील पोलीस स्टेशन ते बाजार तळापर्यंतच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमणे दिवसेंदिवस रस्त्यावर पुढे-पुढे येऊ लागल्याने शहरात येणारी बसही बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. परिणामी प्रवाशांना पायी चालत बसपर्यंत ये-जा करावी लागत होती. येथील बसस्थानक शहरापासून दूर अंतरावर आहे. यामुळे रात्रीच्यावेळी बसस्थानकापासून शहरात प्रवाशांना पायी चालत यावे लागत असे. याचा महिला, वृद्ध यांना मोठा त्रास होत होता. अतिक्रमण दूर केल्याशिवाय बस शहरात येणार नाही, ही बाब ग्रामसभेत समोर आली होती. यावेळी अतिक्रमण हटविण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला होता. यानंतर स्वत:हून अतिक्रमण हटविण्यास ग्रामस्थांना मुदतही देण्यात आली होती. यासंदर्भात ग्रामस्थांनी नोटीसही दिली होती. यानंतर काही नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले. मात्र, काही नागरिकांनी ग्रामपंचायतच्या नोटिसीला न जुमानता अतिक्रमण तसेच ठेवले. ज्यांनी अतिक्रमण काढले नाही, त्यांच्या अतिक्रमणावर ग्रामपंचायतने शुक्रवारी बुलडोजर चालविला. ग्रामपंचायतने अनेकांची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने यावेळी ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची आठवण काढली. अतिक्रमण काढताना ग्रामविकास अधिकारी मधुकर चोपडे, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यास काहींचा विरोध होता. यावर त्यांना अतिक्रमण हटविणे व्यावसायिकदृष्ट्या कसे महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेणार असल्याचेही चोपडे म्हणाले. (वार्ताहर)