शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा

By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST

कडा : आष्टी तालुक्यातील विविध खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या कामामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

कडा : आष्टी तालुक्यातील विविध खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या कामामध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी भाग म्हणून आष्टी तालुक्याकडे पाहिले जाते. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षीच येथे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यात डोंगरी भागही मोठ्या प्रमाणावर असल्याने भूगर्भातही फारशी पाणी पातळी नाही. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच तालुक्यातील गावागावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसू लागतात. गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात ५०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. अनेकदा टँकर चालक ग्रामस्थांना पाणीपुरवठा न करताच केवळ कागदी घोडे नाचवून पाणीपुरवठा केल्याचे दाखवित असल्याचा आरोपही ग्रामस्थातून होत होता. आष्टी तालुक्यात या वर्षीही २०० पेक्षा अधिक गाव , खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाणी पुरवठ्याच्या कामात अनियमितता होऊ नये यासाठी टँकरना जीपीएस यंत्रणा लावण्याची मागणी ग्रामस्थातून होत होती. ग्रामस्थांच्या मागणीचा प्रशासनाने गांभिर्याने विचार केला. यानंतर सर्व १८८ टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली. ज्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार नाही अशा टँकरचे बिल न देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्वच टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. जीपीएस यंत्रणा बसविल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)जीपीएस यंत्रणेची होती मागणी बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आष्टी तालुक्यात.आष्टी तालुक्यातील जवळपास २०० गाव, वाडी, वस्त्यांना होतोय टँकरने पाणीपुरवठा.पाणीपुरवठ्याच्या कामात अनियमितता होऊ नये यासाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याची होत होती ग्रामस्थांची मागणी.अनियमितता रोखण्यासाठी जीपीएस यंत्रणाआष्टी तालुक्यात पाणीटंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. ग्रामस्थांना पाणी मिळावे, अनियमितता होऊ नये यासाठी १८८ टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याचे तहसीलदार राजीव शिंदे यांनी सांगितले.