औरंगाबाद : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असून, दुसर्या दिवशी बुधवारी (दि. २८) १५ इच्छुकांनी २३ नामनिर्देशनपत्रे घेतल्याची माहिती विभागाचे उपायुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी दिली. बीड येथील गणेश आसाराम बाजगुडे यांनी शिवराज्य पक्षामार्फत आणि एक अपक्ष, असे दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. गेल्या दोन दिवसांत २९ इच्छुकांनी ४६ अर्ज घेतले. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे उमेदवार किंवा त्याच्या प्रस्तावकाला दि. ३ जूनपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयातून विनामूल्य दिली जाणार आहेत. विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार आणि महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह मतमोजणीसाठी निश्चित करण्यात येणार्या स्थळांची पाहणी केली.
पहिल्याच दिवशी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल
By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST
औरंगाबाद : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल झाली.
पहिल्याच दिवशी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}