शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पंधरा कोटींचा फटकाऔस

By admin | Updated: October 25, 2014 23:48 IST

तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ चालू वर्षात तर तब्बल ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ पेरणीसाठी

ा : तालुक्यात मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ चालू वर्षात तर तब्बल ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली़ पेरणीसाठी झालेला महिनाभराचा विलंब आणि पावसाचे कमी प्रमाण यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पूर्णत: सोयाबीनवर खिळल्या होत्या़ पण सोयाबीनने शेतकऱ्यांना अडचणीतच टाकले आहे़ सोयाबीनचा एकरी उतारा निम्म्यावर आला आहे तर भावातही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल पंधरा ते सोळा कोटी रूपयांचा फटका बसला असल्याचे पहावयास मिळते़औसा तालुक्यातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ यावर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी महिनाभर उशिराने पाऊस झाला़ पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात पेरा केला़ ९८ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या़ यामध्ये ६० हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले़ पेरणीसाठी बियाणे, खते, मजुरी असा जवळपास ४ कोटी रूपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केला़ त्यानंतर खुरपणी, फवारणी, काढणी आणि राशी करणे यावरही जवळपास ७ ते ८ कोटींचा खर्च आहे़ पेरण्या झाल्यानंतर पावसाने दिलेली ओढ आणि सोयाबीन ऐन बहरात असताना गायब झालेला पाऊस यामुळे उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली़ तसेच चार ते साडेचार हजार रूपये क्विंटलला भाव होता़ पण शेतकऱ्यांकडे माल आल्यास प्रतिक्विंटल अडीच ते तीन हजार रूपयांचा भाव मिळत आहे़एकरी ८ ते १० क्विंटलचा उतार आता ३ ते ६ क्विंटलवर गेला आहे़ त्यातच भाव खालावल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे़ बियाणे, खते, मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ पण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मात्र घसरणीला लागले आहेत़ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन पिकाचा १५ कोटींचा फटका बसल्याने तो उद्धवस्त झाला आहे़ उटी बु़ येथील सरपंच व प्रगतशील शेतकरी अ‍ॅड़ भालचंद्र पाटील म्हणाले, यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रावर ६० ते ७० हजार रूपये खर्च केले होते़ उत्पन्न मात्र १ लाखाचे झाले आहे़ आता वर्षभराचा खर्च, सालगड्याच्या पगारी कशा करायच्या हा प्रश्न आहे़ आता रबीसाठी पाऊस नाही झाला तर शेती कसायची कशी, असा प्रश्न पडला आहे़ (वार्ताहर)