शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

समान दलितवस्ती निधीसाठी उपोषण

By admin | Updated: May 3, 2016 01:06 IST

नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार

नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार समाजकल्याण समितीचे सदस्य रमेश सरोदे यांनी करत सोमवारी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले आहे़ निधी वाटपाची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली़जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे यासाठी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ साठी जिल्हा परिषदेला ३२ कोटी रूपये निधी प्राप्त झाला आह़े मात्र या निधीचे नियोजन हे नियमाला धरून होत नसल्याची तक्रार सरोदे यांनी केली़ या निधीचे वाटप हे पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे करताना कोट्यवधीचा निधी स्वत: घेत सदस्यांची मात्र काही लाखांवर बोळवण केल्याचेही तक्रारीत त्यांनी नमूद केले़ एका समाजमंदिरासाठी लागणाऱ्या ५ लाखांचा निधी हा केवळ दीड लाखांवर आणला आहे़ त्यामुळे ही कामे पूर्ण होणार कशी असा प्रश्नही त्यांनी विचारला़ याबाबत अनेकदा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सरोदे यांनी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले़ या उपोषणास जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांनी पाठींबा दिला आहे़ दरम्यान, या उपोषणास सोमवारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी भेट देवून चर्चा केली़ मात्र सरोदे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले़ विशेष म्हणजे समाजकल्याण समितीच्या बैठकीपूर्वी दलितवस्ती सुधार योजनेच्या कामाचे आॅर्डर काढावेत आणि मगच सभा घ्यावी अशी भूमिका घेतल्याने आॅर्डर निघाल्या़ पण त्यात अनेक सदस्यांच्या निधींची पळवापळवी झाल्याचे उघड झाले़ त्यामुळेच उपोषण केल्याचे ते म्हणाले़दरम्यान, दलितवस्ती निधीतील अनियमिततेप्रकरणी जि़ प़ सदस्या डॉ़ मिनाक्षी कागडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे़ तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनीही या निधीचे फेरनियोजन करण्याची मागणी केली़