गारपिटीच्या भरपाईसाठी पाटोद्यात उपोषण

By Admin | Updated: May 7, 2014 00:01 IST2014-05-07T00:00:57+5:302014-05-07T00:01:45+5:30

पाटोदा:गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु आहे़

Fasting in Patodi to compensate for the hail | गारपिटीच्या भरपाईसाठी पाटोद्यात उपोषण

गारपिटीच्या भरपाईसाठी पाटोद्यात उपोषण

पाटोदा:गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु आहे़ भरपाई द्या, अन्यथा आंदोलन मागे न घेण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे़ फेबु्रवारी अखेर व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला़ त्यामुळे या तालुक्यातील ५३ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले़ त्यापैकी केवळ ३८० हेक्टरवरील पिकांना भरपाई जाहीर झाली़ नुकसानीच्या तुलनेत जाहीर झालेली भरपाई अतिशय तोकडी आहे़ त्यामुळे अनेक शेतकरी विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप भारतीय कृषक समाज व अखिल भारतीय किसान सभेने केला़ फेरपंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लाभ द्यावा, यामागणीसाठी राजाभाऊ देशमुख, महादेव नागरगोजे, विष्णूपंत घोलप, शिवभूषण जाधव यांच्यासह शेतकर्‍यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे़ दरम्यान, मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता़ मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत, असा इशारा उपोषणर्त्यांनी दिला आहे़ याबाबत राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले, गारपिटीत शेतकर्‍यांची उभी पिके नेस्तानाबूत झाली़ मदतीपासून कोणीही वंचित राहाणारनाही, यासाठभ अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील़ तहसीलदार दिनेश झांपले यांनी सांगितले की, गारपिटीच्या भरपाईची रक्कम आलेली आहे़ वाटप सुरु आहे़ कोणावरही अन्याय होणार नाही़ उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेऊन उपाययोजना करु़

Web Title: Fasting in Patodi to compensate for the hail