शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

मृगाच्या ‘हत्ती’ कडे शेतकऱ्यांचे लक्ष

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

यशवंत परांडकर, नांदेड रोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्राला आधार मिळेल, असे वाटले होते. पण तुरळक प्रमाणात पाऊस पाडून रोहिणी नक्षत्र आले तसे निघून गेले. आता सर्व मदार मृग नक्षत्रावर आहे.

यशवंत परांडकर, नांदेडरोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्राला आधार मिळेल, असे वाटले होते. पण तुरळक प्रमाणात पाऊस पाडून रोहिणी नक्षत्र आले तसे निघून गेले. आता सर्व मदार मृग नक्षत्रावर आहे.मृग नक्षत्र हे शेतकऱ्यांचे हक्काचे नक्षत्र असून या नक्षत्रात पाऊस पडल्यास ते पिकांना वरदान ठरणारा असतो. मृगाचे वाहन ‘हत्ती’ असून या नक्षत्रात मोठ्या पावसाची आशा आहे. दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या पावसाला गृहीत धरत नाही, पण मृगावर तो पूर्णपणे विसंबून असतो. या नक्षत्राच्या भरवशावर शेतकऱ्यांनी महागामोलाची बियाणे विकत घेऊन ठेवली आहेत. यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. रोहिणी नक्षत्राचा ‘उंदीर’ म्हणावा तसा पाऊस न पाडता निघून गेला असला तरी मृगाचा ‘हत्ती’ मात्र धो-धो पाऊस पाडेल आणि पाण्यात बसून राहील, अशी आशा आहे. यावर्षी पीक चांगले यावे म्हणून काही शेतकऱ्यांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बियाणे खरेदी केले आहेत. हवामानाचा अंदाज लक्षात घेता यावर्षी चांगला पाऊस पडेल व बळीराजाच्या परिश्रमाचे ‘मोल’ होईल, असे म्हटले तर वावगे ठरू नये, एवढेच. मृग नक्षत्र ८ जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी प्रारंभ होणार असून २१ रोजी संपणार आहे. या नक्षत्राचे वाहन ‘हत्ती’ आहे. रोहिणी नक्षत्राच्या ‘उंदरा’ ने म्हणावा तसा पाऊस पाडला नसला तरी मृग नक्षत्राचा ‘हत्ती’ पेरणीयोग्य पाऊस पाडेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता यावर्षी पर्जन्यवृष्टी अनुकूल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्याचे तापमान ४४ अंशांपर्यंत गेले़ त्यामुळे उन्हाची काहिली सर्वांना असह्य झाली़ अशावेळी पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ आजपासून मृग नक्षत्रास प्रारंभरोहिणी नक्षत्राचा उंदीर पाऊस न पाडताच गेला निघूनहवामान विभागाचा यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाजशेतकऱ्यांनी केली पेरणीची पूर्वतयारीमृग नक्षत्राची साथ मिळण्याची शेतकऱ्यांना आशा