शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी झाला हवालदिल

By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेऊन ठेवले बी-बियाणे घरात पडून आहेत़ पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ५ लाख २९ हजार २१० हेक्टर एवढे आहे़ आतापर्यंत केवळ ३ टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर बागायती कपाशीची लागवड करण्यात आली आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसा आहे त्या शेतकऱ्यांनी गत आठवड्यात खत, बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत़ अद्यापपर्यंत बाजारातील ५० टक्के बी-बियाणे व खताची विक्री झाली आहे़ ज्या बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची लागवड केली आहे, त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे़ येत्या चार-पाच दिवसात पाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अभाळ आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतु, पावसाचा शिडकावाच झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे़ (प्रतिनिधी)
व्यापारीे हतबल
परभणी येथील नवा मोंढा येथील दुकानांत दोन दिवसांपासून शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी फिरकनासे झाले आहेत़ त्यामुळे कृषी दुकानदारांना शेतकऱ्यांची वाट पाहताच दुकानांमध्ये बसावे लागत आहे़ अशी प्रतिक्रिया येथील कृषी दुकानदार सोपान शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली़
शेतकारी संकटात
गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी देशोधडीला गेला़ यंदा मात्र पाऊसच पडत नसल्याने शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कसे जगावे, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे़ शासनस्तरावरून उपाययोजना करणे गरजेचे आहे़
आश्रोबा कवडे-
पांढरगळा, ता़ जिंतूर
पशूपक्षी हवालदिल
पाऊस नसल्यामुळे शेतकरी तर सोडाच परंतु, पशूपक्षी देखील हवालदिल झाले आहेत़ सर्वत्र सन्नाटा पसरला असून, गावात, शेतात कुठेही मन लागत नाही़ उन्हाळ्यासारखी अवस्था पावसाळ्यात झाली आहे़ चार-आठ दिवसात पाऊस न पडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे़
आत्माराम कुटे
वडी, ता़ पाथरी
निसर्गाचा प्रकोप
मृग नक्षत्र संपले असून, पाऊस नसल्याने पेरणी झालेली नाही़ महागामोलाचे बियाणे घरात पडून आहेत़ शेतात पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही़ गतवर्षी पावसाने तर यावर्षी पावसाविना शेतकरी त्रस्त झाला आहे़ निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़
सखाराम रासे, कोठा, ता़ जिंतूर