आरोग्य सहाय्यिका होणार विस्तार अधिकारी

By Admin | Updated: January 8, 2015 00:59 IST2015-01-08T00:31:43+5:302015-01-08T00:59:25+5:30

बीड : जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सहायिकांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे़ त्यांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नत्या मिळणार आहेत़

Expansion Officer will be Health Assistant | आरोग्य सहाय्यिका होणार विस्तार अधिकारी

आरोग्य सहाय्यिका होणार विस्तार अधिकारी

 

बीड : जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सहायिकांना नवीन वर्षाची भेट मिळणार आहे़ त्यांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नत्या मिळणार आहेत़
जिल्ह्यात आरोग्य सहायिकांची २५ पदे मंजूर आहेत़ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात ३, ११ तालुक्यांसाठी प्रत्येकी २ पदांचा समावेश आहे़ आजघडीला १९ पदांवर विस्तार अधिकारी नेमलेले असून ६ जागा रिक्त आहेत़ ५ डिसेंबर २०१२ रोजीच्या शासनादेशानुसार विस्तार अधिकारी पदावर २५ टक्के सरळसेवेने तर ७५ टक्के पदोन्नतीने नियुक्त्या द्यावयाच्या आहेत़ यात महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अटही पाळायची आहे़
सहा महिन्यांचे प्रशिक्षण तसेच सेवाज्येष्ठता हे निकष लावून सध्या कार्यरत असलेल्या ९ आरोग्य सहायिकांपैकी ६ जणींना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती भेटणार आहे़ पदोन्नती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल़ त्यामुळे आरोग्य सहायिकांना न्याय मिळणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Expansion Officer will be Health Assistant