शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच

By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते.

औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते. मात्र, शनिवारी २ ते ३ टनच फुले बाजारात आल्याने चढ्या दरातच फुलांची विक्री झाली. जून महिन्यात झेंडूची लागवड होत असते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने पावसाने हजेरी लावली. परिणामी, बहुतांश ठिकाणी झेंडूची लागवड झाली नाही. ज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, तेथील शेतकऱ्यांनीच झेंडूची लागवड केली. यामुळे दरवर्षीपेक्षा निम्म्याने उत्पादन कमी झाले. दरवर्षी औरंगाबादेत दौलताबाद, वेरूळ, गांधेली, पिसादेवी, पोखरी, सावंगी, कोलठाणा या परिसरातून झेंडूची आवक होत असते. याशिवाय हिंगोली, जिंतूर, जळगाव, नेवासा, नगर आदी भागातूनही झेंडू शहरात आणला जातो. मात्र, परजिल्ह्यांमधून यंदा झेंडूची आवक नगण्य झाली. परिणामी, शहरात मागणीच्या तुलनेत कमी आवक झाल्याने झेंडूचे भाव कडाडले होते. दसऱ्याच्या दिवशी ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत झेंडू विक्री झाला. झेंडूला चांगला भाव मिळाल्याने विक्रेते खुश झाले होते. कारण, शेतकऱ्यांकडून ४० रुपये किलोने खरेदी केलेल्या झेंडूची दुप्पट भावाने विक्री झाली. यात शेतकऱ्यांचा नव्हे, तर विक्रेत्यांचा फायदा झाला. मात्र, काही शेतकऱ्यांनी स्वत: गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा, शिवाजीनगर, जालना रोड, हर्सूल टी पॉइंट, टीव्ही सेंटर चौकात झेंडू विकला, त्यांना फायदा झाला. झेंडू महागल्याने किलोभर फूल खरेदी करणारे अर्धा किलो किंवा पावशेर खरेदी करण्यातच धन्यता मानत होते. दसरा संपल्यानंतर शनिवारी मागणी कमी झाल्याने झेंडू व अन्य फुलांचे भाव कमी होतील, असा अंदाज होता; पण तसे झाले नाही. आजही झेंडू अडत बाजारात ७० ते ८० रुपये किलोनेच विक्री झाला.