शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: June 19, 2016 23:20 IST

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मोठा पाऊस झाल्यानंतरच जिल्ह्यामध्ये पेरण्यांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा थांबलेली नाही.शनिवारी रात्री १० वाजेपासून परभणी शहर आणि परिसरात पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्या सुमारास तुरळक असलेल्या या पावसाने रविवारी पहाटेपासून मात्र बऱ्यापैकी जोर धरला. पहाटे पाच वाजेपासून पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. शहर परिसरात मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. सकाळी ९ वाजेपर्यंत हा पाऊस होता. रविवारी सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरुच होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाच ते दहा मिनिटांचा जोरदार सडाका झाला. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत भूरभूर पाऊस होत होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. अल्पशा पावसानेही शहरातील रस्त्यांची दैना झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, ताडकळस येथे पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)पूर्णा तालुका : ९.८ मि.मी. पावसाची नोंदपूर्णा तालुक्यात १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसास सुरुवात झाली. काही वेळ विश्रांती घेत रात्रभर रिमझिम पाऊस पडला. पूर्णा, चुडावा, कावलगाव, ताडकळस, एरंडेश्वर, कात्नेश्वर , वझूर आदी भागात कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस होता. महसूल विभागाच्या नोंदीनुसार एकूण ४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुका पर्जन्यमान अहवालानुसार पूर्णा मंडळ १२ मि.मी. ,चुडावा १८, कात्नेश्वर १.०, ताडकळस ८.०, लिमला १० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरीमध्ये ९.८ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती महसूल विभागाचे शिवप्रसाद वाव्हळे यांनी दिली.गंगाखेड तालुक्यात सरासरी ६ मि.मी. पाऊसगंगाखेड तालुक्यात चारही मंडळात शनिवारी रात्री ९ वाजेपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. गंगाखेड मंडळात ५ मि.मी., महातपुरी ३, राणीसावरगाव ४, माखणी सर्वाधिक १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण २४ मि.मी.पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. ६ मि.मी. सरासरी पाऊस झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांनी दिली आहे.सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ येथेही १९ जून रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. सेलू, मानवत, पाथरी येथे रविवारी पावसाचा जोर होता. या पावसामुळे सेलू येथे मोंढ्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची फजिती झाली.