शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर मंदीर, वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमणावर लवकरच हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:14 IST

खुलताबाद तहसील कार्यालयात बैठक; १५ ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण हटविणार

खुलताबाद: वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थान परिसर तसेच जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील विकास काम करण्यासंदर्भात मंदीर व लेणी परिसरातील झालेले अतिक्रमण लवकरच हटविण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ११ जुलै रोजी दिलेल्या पत्रानुसार नाशिक येथे कुंभमेळा भरणार असून त्यासाठी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर देवस्थानच्या दर्शनासाठी ५ ते १० लाख भाविकांची गर्दी अपेक्षित धरता या परिसरातील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सर्व  संबंधित विभागप्रमुखांना या संबंधित प्रारूप आराखडा तयार करून नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. 

श्री घृष्णेश्वर मंदिर समोरील व परिसरातील अतिक्रमण , त्याचबरोबर सोलापूर- धुळे महामार्ग ते वेरूळ मंदीर रस्त्यावरील अतिक्रमण, दौलताबाद टी पॉईंट ते वेरूळ मंदीरापर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी आज बुधवारी खुलताबाद तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 

या बैठकीस तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता दिलीप कोलते, उपअधीक्षक भूमी अभिलेख सेवक, श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे, सरपंच कुसूमबाई मिसाळ आदीसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळEnchroachmentअतिक्रमण