शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनो ! तीन ते पाच आॅफिसमध्येच बसा...

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

सोमनाथ खताळ , बीड आपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात

सोमनाथ खताळ , बीडआपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात बसण्याऐवजी इतरत्र टवाळक्या मारत फिरायचे, मात्र आता याला आळा बसणार आहे. दुपारी तीन ते पाच यावेळेत जर कर्मचाऱ्यांनी आॅफिस सोडले तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.मागील काही दिवसांपासून पालीकेतील दांडीबहाद्दर व कामात हालगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी म्हणून भालसिंग यांनी सूत्रे स्वीकारली आणि पालिकेत शिस्त काय असते याचा नमूना कर्मचाऱ्यांना पहावयास मिळाला. यापूर्वी कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांचा वचक नसल्याने कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवायचे. मात्र आता भालसिंग यांनी दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना चांगलाच दम दिला आहे.पालीकेच्या कामात गतिमानता यावी, शहरातील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचा निपटारा व्हावा, या उद्देशाने मुख्याधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत पलाीकेतील कर्मचाऱ्यांनी दुपारच्यावेळेस आॅफिस सोडायचे नाही, असे सक्त आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला तसे पत्रही पाठविले आहे. पत्र पाठवून त्यांची रिसिव्हड कॉपी घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे पी.ए.पाटील यांनी सांगितले.आठवड्याचा अहवाल सोमवारी लेखी स्वरूपात द्याआठवड्यात किती नागरीकांच्या तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल प्रत्येक सोमवारी कार्यालयास सादर करावा. तसेच नागरीकांच्या तक्रारी परस्पर वरीष्ठांकडे जातील, याची दक्षता घ्यावी, असे प्रत्येक विभागाला पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.यांना पाठविले पत्रनगररचनाकार, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभाग प्रमुख, मलेरीया पर्यवेक्षक, सार्वजनीक बांधकाम, विद्युत अभियंता,कर अधिकारी यांना हे पत्र पाठविले असून असून मंगळवारी प्रत्येकाला हे पत्र मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.