शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा केंद्राच्या मुदतवाढीसाठी जोर

By admin | Updated: May 8, 2014 23:20 IST

लातूर : नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे़

लातूर : नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे़ हरभरा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना चार-चार दिवस वेटिंग असल्याने बरेच शेतकरी अडकून पडले आहेत़ शिवाय, हरभर्‍याची आवक सुरुच आहे़ त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे़ लातुरातील एमआयडीसी भागात वखार महामंडाळाच्या गोदामांमध्ये सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर ३१०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येत असल्याने शेतकर्‍यांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे़ बाजार समित्यांमध्ये उच्च प्रतीच्या हरभर्‍याला केवळ २५०० ते २७०० रुपये इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी या केंद्राकडे वळले आहेत़ त्यामुळे खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत़ केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने चार काट्यांवरुनच वजन केले जात आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांना चार-चार दिवसांची वेटिंग लागली आहे़ वाहनाचे भाडे सोसून ते रांगेत आहेत़ दरम्यान, १० मे पासून हे खरेदी केंद्र बंद करण्याच्या सूचना नाफेडने दिल्या आहेत़ त्यामुळे शेवटच्या टोकाला असलेल्या शेतकर्‍यांना आपला नंबर लागेल की नाही, याची शाश्वती नसल्याने त्यांची घालमेल वाढली आहे़ शिवाय, नव्याने येणार्‍या शेतकर्‍यांनाही आपल्या हरभर्‍याचा काटा होईल, याची शाश्वती नाही़ त्यामुळे आता केंद्राच्या मुदतवाढीची मागणी जोर धरु लागली आहे़ माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी या केंद्रावरील शेतकर्‍यांची भेट घेऊन मार्केटिंग फेडरेशन व नाफेडकडे ३० मेपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे़ तसेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनेही शेतकर्‍यांचे हीत लक्षात घेऊन १० मे रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत खरेदी केंद्रावर येणार्‍या शेतकर्‍यांच्या नोंदी घेऊन त्यांचा माल घेण्याची विनंती लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे़ दरम्यान, शेतकर्‍यांची मागणी, तसेच बाजार समिती, माजी आमदार कव्हेकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे मार्केटिंग फेडरेशनने नाफेडकडे मार्गदर्शन मागविले आहे़ त्यांची परवानगी मिळाल्यास केंद्रास मुदतवाढ देण्यात येईल, असे फेडरेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले़(प्रतिनिधी)