शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: May 24, 2014 01:35 IST

संजय खाकरे, परळी महावितरण कार्यालयाकडून वीज बिल न भरणार्‍या ग्राहकांवर सध्या कठोर कारवाई करण्यात येत आहे.

संजय खाकरे, परळी महावितरण कार्यालयाकडून वीज बिल न भरणार्‍या ग्राहकांवर सध्या कठोर कारवाई करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडून परळी शहरात थकित वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी शहरातील सुमारे ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आणखी अनेक ग्राहकांकडे थकित बिल असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्टÑ राज्य वीज वितरण कंपनीच्या परळी येथील कार्यालयाने थकित वीज बिल वसुलीच्या मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. या मोहिमेत ज्या ग्राहकांकडे थकित वीज बिल आहे, अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. परळीत घरगुती, वाणिज्य, औद्योगिक विजेची १४ हजार ग्राहकांकडे ६ कोटी ७४ लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. या अगोदर संबंधित ग्राहकांना वेळोवेळी थकित वीज बिल भरण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी बिले न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने हा कारवाईचा बडगा उगारला. शहरात ठिकठिकाणी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा कारवाईसाठी सकाळपासूनच रवाना झाला होता. ज्या ग्राहकांकडे थकित वीज बिल आहे अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन कर्मचार्‍यांमार्फत तोडण्यात आले. साहित्यही वीज वितरण कंपनीने जप्त केले. मे महिन्यात यापैकी ४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीकडे पुढे आहे. ४ कोटीचे उद्दिष्ट असल्यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी या कारवाईला वेग दिला आहे. २२ मे पर्यंत ८० लाख वसुली झाली असल्याचे वीज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांनी सांगितले. १ मेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम सुरू करुन २३ दिवस उलटले तरी ग्राहकांनी आपले थकित वीज बिल महावितरणकडे जमा केले नाही. त्यामुळे महावितरण कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी ज्या ग्राहकांनी थकित वीज बिल ठेवले आहे अशांचे वीज कनेक्शन तोडले. वीज बिल भरा, कनेक्शन तोडणे टाळा वीज बिल भरुन नागरिकांनी वीज वितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांनी केले आहे. ‘वीज बिल भरा आणि कनेक्शन तोडणे टाळा’ अशी मोहीमच महावितरण कार्यालयाने सुरू केली असल्याचे चित्र परळी येथे दिसून येत आहे. जे ग्राहक आपले राहिलेले थकित वीज बिल भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे. बड्या हस्ती थकबाकीदारांनीही आपले थकित वीज बिल भरावे अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. या कारवाया उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सुहास मिसाळ, अमोल पिंगळे तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत केली जात आहे. थकित वीज बिल ग्राहकांची या कारवाईमुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.