शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन नसतानाही रोजच होते वीज गुल

By admin | Updated: May 25, 2014 01:30 IST

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे.

औरंगाबाद : मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली मागील दोन महिन्यांपासून शहरात कोणत्या ना कोणत्या भागात २ ते ७ तासांपर्यंत विजेचे छुपे भारनियमन केले जात आहे. याची पूर्वकल्पना शहरवासीयांना दिली जात नाही. परिणामी, दुपारच्या वेळी अचानक वीज गुल झाल्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत. मान्सूनपूर्व कामे करा; पण त्याची पूर्वसूचना शहरवासीयांना द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या उलट गारखेडा, बीड बायपास, सातारा, मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात दररोज वीज गुल होत असल्याने छुपे भारनियमन सुरू केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा व बिल वसुलीची जबाबदारी जीटीएलवर सोपविली. मात्र, शहरात वीजपुरवठा अखंडित ठेवण्यात जीटीएलला अपयश आले आहे. मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली सर्रासपणे शहरात भारनियमन केले जात आहे. दर शुक्रवारी सक्तीने भारनियमन केले जातच आहे. याशिवाय अन्य दिवसांतही शहरातील वेगवेगळ्या भागांतील लाईट दोन ते चार तासांपर्यंत गायब करण्यात येत आहे. औरंगपुर्‍यातील महेंद्र गजभय्ये यांनी सांगितले की, दुकानातील लाईट कधी गायब होईल याचा नेम नाही. जेव्हा लाईट जाते तेव्हा आम्ही जीटीएलच्या तक्रार केंद्रावर फोन करतो; पण कोणीच दाद देत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जवाहर कॉलनीतील अशोक रंजलकर यांनी सांगितले की, दर दोन ते तीन दिवसांआड आमच्या परिसरातील लाईट दिवसा बंद केली जाते. डीपीची पाहणी केली तर तिथे कोणतेही काम सुरू नसते. परिसरात फिरून पाहिले तर जीटीएलचा कोणीच कर्मचारी विद्युत खांबावर काम करताना आढळून येत नाही. मग लाईट कशासाठी बंद केली जाते हेच कळत नाही. सातारा परिसरातील द्वारकादास जाधव या रहिवाशाने प्रश्न केला की, जीटीएलला भारनियमन करण्याचा अधिकार कोणी दिला? आम्ही नियमित वीज बिल भरत असताना आम्हाला भारनियमनाची शिक्षा का? असेच प्रश्न शिवाजीनगर, पुंडलिकनगरातील नागरिकांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरात भारनियमन करायचे नाही, असे राज्य शासनाचे धोरण आहे. हा नियम राज्यभर लागू होतो. शहरात वीज गळती व थकबाकीचे प्रमाण वाढल्याने येथे भारनियमन करण्यात यावे, असे पत्र जीटीएलने महावितरणाला पाठविले आहे. औरंगाबादेत भारनियमन करताच येत नाही. जे प्रामाणिकपणे बिल भरतात त्यांना छुप्या भारनियमनाचा फटका बसत आहे, मान्सूनपूर्वीची कामे करावीत; पण त्याविषयी माहिती देणे हे जीटीएलचे काम आहे. -हेमंत कापडिया, प्रतिनिधी, वीज नियामक आयोगशहरातील काही भागात १८ ते ३० टक्क्यांपर्यंत वीज गळती होत आहे व काही भागात ४२ ते ४५ टक्क्यांपर्यंत थकबाकी पोहोचली आहे. शहरात १६९ फिडर आहेत. त्यापैकी ८८ फिडरवर भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी जीटीएलने महावितरणाकडे केली आहे. वीज गळती रोखणे व थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलावी लागणारच आहेत. -समीर पाठक, पीआरओ, जीटीएल